Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: गोव्यात इको सेन्‍सेटिव्ह झोनला वाढता विरोध, फळदेसाईंनंतर वनमंत्री विश्वजीत राणेही मैदानात

99 गावे वगळण्याबाबत मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा; केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना ई-मेल वरून कळवली भावना

गोमन्तक डिजिटल टीम

Vishwajit Rane: इको सेन्‍सेटिव्ह झोनमध्ये येणाऱ्या गोव्‍यातील 99 गावांना वगळावे, अशी मागणी राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने यासंबंधी मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यासंदर्भात सकाळीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याशी चर्चा झाली असून लवकरच आम्ही आमची मागणी केंद्र सरकारकडे मांडू, असेही राणे म्‍हणाले.

दरम्यान, यापुर्वी सांगे ग्रामस्थांच्या याबाबतच्या भुमिकेला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता वनमंत्री राणेही गावकऱ्यांच्या बाजुने उभे राहिले आहेत.

वन संरक्षित जागांचे, अभयारण्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात 60 टक्के पेक्षा जास्त जंगल कव्हर आहे. त्यामुळे गोव्याला इको सेन्सेटिव्ह झोनची आवश्यकता नाही. साहजिकच या मसुदा अधिसूचनेत येणाऱ्या राज्यातील 99 गावांना यामधून वगळण्यात यावे यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच आम्ही केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि वन विभागाचे प्रधान सचिव सी. पी. गोयल यांना सविस्तर हरकत आणि अहवाल पाठवणार आहोत. आजच वनमंत्री म्हणून माझी भूमिका ईमेलद्वारे या मंत्रालयाला कळवली आहे, असे राणे म्‍हणाले.

मुख्यमंत्री सावंत याबाबत लवकरच मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. जंगलासभोवताली राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या हितांचे रक्षण करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. त्यानुसार आम्ही लोकांसमवेत आहेत. आज ठिकठिकाणच्या लोकांकडून अशा इको सेन्सेटिव्‍ह झोनला विरोध होत आहे. कर्नाटकातही विरोध होत आहे. तिथेही भाजप सरकार आहे. त्यामुळे या झोनला विरोध असणाऱ्या लोकांची भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या वन पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने जंगल संवर्धनासाठी काढलेल्या मसुदा अधिसूचनेमधून आमची सर्व 99 गावे वगळावीत हीच आमची प्रमुख मागणी आहे.आणि आम्ही ती लावून धरू. कारण राज्यात 60 टक्के पेक्षा जास्त फॉरेस्ट कव्हर आहे आणि या जंगलांचे संवर्धन आम्ही करत आहोत.

- विश्वजीत राणे , वनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT