Goa Forest Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Forest Fire: सत्तरीत काजू बागायतीला आग; दोन हजार काजू कलमे जळून खाक

अडवई सत्तरी येथील घनश्याम देसाई व मधुकर देसाई यांच्या काजू बागायतीला आग लागण्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Forest Fire: गोव्यात अजूनही जंगलात आग लागण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अडवई सत्तरी येथील घनश्याम देसाई व मधुकर देसाई यांच्या काजू बागायतीला आग लागण्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, अंदाजे दोन हजार काजू कलमे, आंब्याची झाडे व इतर पीके जळून खाक झाली आहेत. वाळपई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरु आहे. आग कशी लागली याचा शोध घेतला जात आहे. कोणीतरी जाणून बुजुन आग लावली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

ऐन पीक घेण्याच्या वेळी काजू पीक जळून खाक झाली आहे. त्यामुळे बागायतदार संकटात आले आहेत. येथील घनश्याम देसाई व मधुकर देसाई यांच्या काजू बागायतीला आग अंदाजे दोन हजार काजू कलमे, आंब्याची झाडे व इतर पिक जळून खाक झाले आहे. वाळपई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, कुंकळ्ळी येथे एका उडपी हॉटेलला मध्यरात्रीच्या वेळी आग लागून संपूर्ण हॉटेल जाळून खाक झाले. यात या हॉटलची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. आग लागण्याचा प्रकार मध्यरात्रीच्या वेळी 12 वाजण्याच्या दरम्यान घडला होता. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेऊन आग वीजविण्याचा प्रयत्न केला यात त्यांना काही प्रमाणाची मालमता वाचविण्यात यश आले.

साधारण 45 मिनिटे ही आग असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

SCROLL FOR NEXT