Goa New Waterfalls Opened Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Tourism: नवीन धबधब्यांची ठिकाणे करणार खुली; दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी- डॉ. दिव्या राणे

Goa New Waterfalls Opened: गोव्यातील निसर्ग पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी गोवा वन विकास महामंडळाने या पावसाळी हंगामात काही नवीन धबधब्यांची ठिकाणे शोधून ती पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्यातील निसर्ग पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी गोवा वन विकास महामंडळाने या पावसाळी हंगामात काही नवीन धबधब्यांची ठिकाणे शोधून ती पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटकांना गोव्याच्या अंतर्गत भागातील निसर्गाचे नवे रूप पाहायला मिळणार असून, मुख्य पर्यटनस्थळांवरील गर्दीचा ताणही कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी केले.

महामंडळाच्या बैठकीत राणे बोलत होत्या. या बैठकीला राज्याचे मुख्य वनसंरक्षक कमल दत्त, व्यवस्थापकीय संचालक के. रमेश कुमार, महाव्यवस्थापक अमर हेबळेकर आणि मंडळाचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. राणे म्हणाल्या की, पावसाळ्यात धबधब्यांच्या ठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. विविध धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक यंत्रणा तैनात करणे, नागरी सुविधा, धबधब्यांच्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा अधिक चांगल्या आणि सुटसुटीत करणे आदींवर विशेष भर देण्यात असे निर्देश देण्यात आले आहेत.

कौटुंबिक पर्यटनाचे केंद्र

प्रसिद्ध बोंडला अभयारण्यातील कॉटेजिसच्या सुविधांचा दर्जा सुधारण्यावर आणि पर्यटकांसाठी ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया अधिक सोपी व सुलभ करण्यासाठी वेबसाईट मॅनेजमेंट उत्तम करण्यावर भर दिला जाईल. तसेच साळावली धरणाच्या परिसरातील चिल्ड्रन्स पार्कच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. हे पार्क लवकरच कौटुंबिक पर्यटनाचे मोठे केंद्र ठरणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT