मोरजी: चांदेल हणखणे या तिळारी कालव्यात 3 गवे रेडे पडले होते आणि त्या तिन्ही गव्या रेड्यांना सुखरूपपणे कालव्यातून बाहेर काढण्यास तूये वन खात्याला यश आले. 19 रोजी सकाळी साडे 9 वाजता अडखळणे या टिळा रवीच्या कालव्यामध्ये एकूण तीन रानटी गवे रेडे पडले होते आणि त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता याची माहिती स्थानिकांनी वनखात्याला दिली त्यानंतर वन खात्याचे अधिकारी आणि खास पथक शिवाय जमाव जमू नये यासाठी पोलिसही तैनात करण्यात आले होते.
(goa forest department managed to get all the three Indian Gaur out safely)
19 रोजी सकाळी साडे नऊच्या दरम्यान हे तीन गवे या कालव्यात पडले होते. आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी अडचण येत असतानाच स्थानिकांनी वनखात्याला माहिती दिली. वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याशिवाय एक खास पथक ज्या पथकाला रानटी जनावरे जर एखाद्या वेळी कालव्यात पडली, किंवा विहिरीत पडली तर ती कशा पद्धतीने काढायची याचे प्रशिक्षण दिलेले एक पथक घटनास्थळी पोहोचले. आणि त्या पथकाच्या सहाय्याने शिवाय स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून या तिन्ही गव्यांना दुपारी दोन पर्यंत सुरक्षित वरती काढण्यात आले.
तुये वनाधिकारी गिरीश बैलूटकर यांनी माहिती देताना सांगितले की या कालव्यामध्ये तीन गवे सकाळी साडेनऊच्या दरम्यान पडल्याची माहिती मिळताच या ठिकाणी वनखात्याचे कर्मचारी खास पथक या ठिकाणी हजर झाले.
शिवाय पोलिसांचेही सहकार्य घेऊन या तिन्ही गव्यांना सुखरूप पणे बाहेर काढण्यासाठी यश मिळालेले आहे.
दरम्यान मागच्या वेळी जे दोन गवे मृत्यू पडले होते याविषयी त्यांना छेडले असता त्यांनी सांगितले की दोन्ही गवे मेल होते त्यामुळे आतच पाण्यात त्यांची झुंज झाली होती आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला होता. वरती त्यांना काढण्यात आले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला आणि त्या प्रकारचा अहवालही वैद्यकीय आला होता. आजचे तीन गवे सुखरूपपणे वरती काढण्यास सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल अधिकाऱ्याने सर्वांचे आभार मानले
दरम्यान या कालव्यात जर एखाद्यावेळी जनावर पडू नये त्यासाठी जलसिंचन खात्याने कालवे सुरक्षित करावे अशी मागणी केली जात आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.