पणजी, गोव्यातील पर्यटनाची पायाभूत सुविधा चांगली आहे, पण ती जागतिक दर्जाप्रमाणे नाही, त्यामुळे आम्हाला दर्जेदार पर्यटक मिळत नाहीत, असे निरीक्षण पर्यावरण सचिव अरुणकुमार मिश्रा यांनी दोनापावल येथे नोंदवले.
राज्य सकल उत्पादनात पर्यटन क्षेत्राचा वाटा ३० ते ३५ टक्के आहे, त्यामुळे ही बाब महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक बँकेने आयोजित केलेल्या ''इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स मीट'' परिषदेतील चर्चेत भाग घेताना ते म्हणाले, पर्यटन उद्योगातील फ्लाय-बाय-नाईट ऑपरेटर कायद्यांचे उल्लंघन करतात, ज्याचा फटका पर्यावरणाला देखील बसतो.
गोवा आकाराने लहान असला तरी, राज्यातील प्रति किलोमीटर लोकसंख्या सुमारे ४०० व्यक्ती आहे, जी देशातील सर्वाधिक आहे. राज्यात दररोज चार लाख लोक येतात. गोव्याची सर्वाधिक लोकसंख्या किनारपट्टीच्या भागात केंद्रित आहे.१०४ किलोमीटरचा समुद्रकिनारा असलेल्या राज्यात एक कोटी लोक राहतात आणि धोरणकर्त्यांसाठी हे सर्वात मोठे आव्हान आहे.
या परिषदेत धोरणकर्ते, वित्तीय संस्था, व्यवसाय आणि समुदायाचे प्रतिनिधी एकत्र येऊन अनुकूलनासाठी वित्तपुरवठा करण्याच्या संधींवर चर्चा करण्यात आली.
यशस्वी राज्य-चालित हवामान उपायांची प्रतिकृती तयार करण्यासाठी तरतूद यावरही विचारमंंथन झाले.
हवामान वित्तपुरवठ्यातील नावीन्य, हवामान कृतीसाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे, शाश्वत शीतकरण, समुदायाच्या नेतृत्वाखालील लवचिकता आणि किनारी लवचिकता ही परिषदेतील चर्चेची आणि परस्पर सहकार्याची क्षेत्रे होती.
‘फ्लाय-बाय-नाईट’ चे आव्हान
‘फ्लाय-बाय-नाईट ऑपरेटर’ पर्यावरणीय कायद्यांसह सर्व प्रकारच्या कायद्यांचे उल्लंघन करण्यास जबाबदार आहेत. म्हणूनच पर्यावरणावर परिणाम होऊ नये म्हणून आपण शाश्वत पर्यटन मॉडेल आणले पाहिजे. या फ्लाय-बाय-नाईट ऑपरेटर्ससाठी राज्याचे दरवाजे सताड उघडले जाणार नाहीत, याची खात्री करणे हे राज्य सरकारसमोर आव्हान आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.