स्वीडन फर्नांडिस Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: गोव्याचा स्वीडन फर्नांडिस नेरोकातर्फे खेळणार

Indian Super League स्पर्धेत गोव्याचा फुटबॉलपटू (Football) स्वीडन फर्नांडिस मणिपूरच्या नेरोका एफसीतर्फे खेळणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गतमोसमात हैदराबाद एफसीने करारबद्ध केलेला युवा गोमंतकीय फुटबॉलपटू स्वीडन फर्नांडिस आगामी आय-लीग (Indian Super League) स्पर्धेत मणिपूरच्या नेरोका एफसीतर्फे खेळणार आहे. यासंदर्भात शनिवारी मणिपुरी संघाने हैदराबादच्या संघाशी एका मोसमाचा करार केला. (Goa footballer Sweden Fernandes will play for Manipur's Neroca FC.)

विंगर असलेला स्वीडन फर्नांडिस 21 वर्षांचा असून नेरोका एफसी संघात लोन पद्धतीनुसार दाखल होईल. 2020-21 मोसमात इंडियन सुपर लीग (Indian Super League) स्पर्धेत स्वीडन हैदराबाद संघात होता. आय-लीग स्पर्धेत नेरोका एफसीतर्फे खेळताना स्वीडनला महत्त्वपूर्ण स्पर्धात्मक अनुभव प्राप्त होईल आणि त्याला कौशल्य विकासाची संधी लाभेल, असे हैदराबाद एफसीला वाटत आहे.

यंदाची आय-लीग स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात कोलकाता येथे खेळणे अपेक्षित असून या स्पर्धेत एकूण 13 संघांचा समावेश असेल. आय-लीग स्पर्धेच्या कालावधीत हैदराबाद एफसी स्वीडनची कामगिरी व प्रगतीवर लक्ष ठेवून असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT