Goa Football Professional League 2023 -24 
गोवा

रविवारपासून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा, सुरवातीच्या दोन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

राज्यातील फुटबॉलमध्ये अनैतिकतेला अजिबात थारा नसेल- कायतान फर्नांडिस

किशोर पेटकर

Goa Football Professional League 2023 -24: मागील काही वर्षे सामना निकाल निश्चिती (मॅच फिक्सिंग) आरोपांमुळे गोवा फुटबॉल असोसिएशनची (जीएफए) प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा कलंकित झाली, मात्र त्या प्रकरणातून संघटनेने योग्य धडा घेतला असून आता राज्यातील फुटबॉलमध्ये अनैतिकतेला अजिबात थारा नसेल, असे जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी बुधवारी ठासून सांगितले.

२०२३-२४ मोसमातील गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला रविवारपासून (ता. २७) सुरवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जीएफए अध्यक्ष कायतान बोलत होते. ते म्हणाले, ‘‘हल्लीच आम्ही सर्व संघांसाठी नैतिकता कार्यशाळा घेतली. संघ स्पर्धेत सचोटीने खेळतील याची आम्हाला आशा आहे. कोणतीही अनैतिक प्रथा आमच्या निदर्शनास आणून दिल्यास ते प्रकरण गांभीर्याने हाताळले जाईल, तसेच संबंधित खेळाडू आणि संघांवर कठोर कारवाई करण्यात येईल.’’

यंदापासून आम्ही स्पर्धा अधिक रोमांचक बनविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. सुरवातीचे सामने म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर खेळले जातील. नंतरच्या कालावधीत राज्यातील इतर मैदानावरही सामने घेण्याचे नियोजन आहे, असे कायतान यांनी नमूद केले. स्पर्धेत यंदा १३ संघांचा समावेश आहे.

एफसी गोवा-चर्चिल ब्रदर्स सलामी

यावेळच्या गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेतील पहिला सामना रविवारी एफसी गोवा व चर्चिल ब्रदर्स या माजी विजेत्या संघांत धुळेर येथे खेळला जाईल. गतविजेता धेंपो क्लब स्पर्धेतील पहिला सामना २९ ऑगस्ट रोजी स्पर्धेतील नवा संघ कुठ्ठाळी व्हिलेजर्सविरुद्ध खेळेल. पॅक्स ऑफ नागोवा क्लबला थेट प्रवेश मिळाला आहे.

३१ रोजी गतउपविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवाविरुद्धच्या लढतीने ते मोहिमेला सुरवात करतील. थेट प्रवेशाद्वारे संघात दाखल झालेला आणखी एक संघ जीनो स्पोर्टस क्लब दोन सप्टेंबर रोजी चर्चिल ब्रदर्सविरुद्धच्या लढतीने स्पर्धेत पदार्पण करेल.

स्पर्धेतील सुरवातीच्या दोन फेऱ्यांचे वेळापत्रक

पहिली फेरी

ता. २७ ऑगस्ट: एफसी गोवा विरुद्ध चर्चिल ब्रदर्स, ता. २८: सेझा फुटबॉल अकादमी विरुद्ध यंग बॉईज ऑफ टोंक, ता. २९ : धेंपो विरुद्ध कुठ्ठाळी व्हिलेजर्स, ता. ३०: कळंगुट असोसिएशन विरुद्ध पणजी फुटबॉलर्स, ता. ३१: पॅक्स ऑफ नागोवा विरुद्ध स्पोर्टिंग क्लब द गोवा, ता. १ सप्टेंबर: गार्डियन एंजल विरुद्ध वास्को क्लब.

दुसरी फेरी

ता. २ सप्टेंबर: चर्चिल ब्रदर्स विरुद्ध जीनो क्लब, ता. ३: पणजी फुटबॉलर्स विरुद्ध धेंपो क्लब, ता. ४ : स्पोर्टिंग क्लब द गोवा विरुद्ध एफसी गोवा, ता. ५: कुठ्ठाळी व्हिलेजर्स विरुद्ध कळंगुट असोसिएशन, ता. ६: सेझा फुटबॉल अकादमी विरुद्ध गार्डियन एंजल, ता. ७: वास्को क्लब विरुद्ध पॅक्स ऑफ नागोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT