Goa, FDA Raid Dainik Gomantak
गोवा

Goa, FDA Raid: ‘एफडीए’कडून राज्यात धडक कारवाई सुरुच; एवढ्या लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त

FDA Raid: दोन दिवसांनी चतुर्थी असल्याने बाजारपेठेत भेसळयुक्त आणि परवाना नसलेली उत्पादने उपलब्ध केली जात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

दोन दिवसांनी चतुर्थी असल्याने बाजारपेठेत भेसळयुक्त आणि परवाना नसलेली उत्पादने उपलब्ध केली जात आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न आणि औषध विभागातर्फे २० दिवसांपूर्वीपासून अचानक छापा टाकणे सुरू झाले आहे. गोव्यात अलीकडेच विभागातर्फे टाकण्यात आलेल्या छाप्यात सुमारे ३.१८ लाख रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.

विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उत्तर गोव्यात १६ ऑगस्ट रोजी टाकलेल्या छाप्यात बिस्कीट आणि मिठाई जप्त करण्यात आली. त्यांची किंमत सुमारे १८,००० रुपये होती. २७ ऑगस्ट रोजी टाकण्यात आलेल्या छाप्यात विनापरवाना फरसाण, शेंगदाणे आणि कच्चा माल विक्री करत असल्याचे आढळले. हे साहित्य सुमारे १ लाख रुपयांचे होते. २८ ऑगस्ट रोजी खजूर, मिठाई, बिस्किटे आणि दूध तसेच फरसाण हे विनापरवाना विकत असल्याने सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात विभागाला यश आले.

दरम्यान, विभागाला काही दुकाने आणि उत्पादन युनिट अस्वच्छ परिस्थितीत आढळली. काहींनी अन्न आणि औषध विभागाकडून व्यवसाय करण्याची परवानगीदेखील घेतली नव्हती.

किरकोळ दुकानांवरही छापा

दक्षिण गोव्यात छाप्यादरम्यान सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये फरसाण, किसलेले खोबरे, मिठाई आणि विनापरवाना उत्पादनांचा समावेश आहे. आंतरराज्य बसेसदेखील विभागाने तपासल्या आहेत. तसेच किरकोळ दुकाने आणि उत्पादन युनिटवरदेखील छापा टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT