वांते सत्तरी येथे कोसळलेल्या घरासमोर उभे असलेले पांडू व उत्तम गावडे यांचे कुटुंब Dainik Gomantak
गोवा

Goa Flood: वांते सत्तरीत गावडे कुटुंबाचे घर कोसळले

घर (House) कोसळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या भिरोंडा पंचायत क्षेत्रातील वांते बोनकवली येथिल पाडुं गावडे आणि उत्तम गावडे यांचे घर(House) कोसळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज पंच नितीन शिवडेकर यांनी व्यक्त केला आहे.

सत्तरी तालुक्यातील भिरोंडा पंचायत क्षेत्रात पावसाच्या तडाख्याचा फार मोठा फटाका बसला आहे, यामध्ये फळ बागायतीचे नुकसान होताना बऱ्याच नागरिकांची घरे कोसळली आहे. त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना बेघर होण्याची पाळी आली आहे. त्यात आर्थिक परिस्थितीचें चटके सहन करणाऱ्या पांडू व उत्तम गावडे यांचे घर कोसळून संपुर्ण संसार उद्धवस्त झाला आहे. सदर घटनेची दखल घेऊन सरकारने त्वरित मदत करावी अशी मागणी पांडू व उत्तम गावडे यांच्यानी केली आहे.

सदर कोसळलेल्या घरामुळे गावडे कुटुंबाचे घरातील किंमती साहित्य मिळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज पंच नितीन शिवडेकर यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police Station: झुरळे-डासांनीच सरकारला जाग! पोलिस ठाण्याच्या स्थितीवर प्रभव यांची सडकून टीका

Knife Attack: फुटबॉल सामन्यातील वादातून दोघांवर हल्ला, जुने गोवे पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल

Goa Tourism: पर्यटकांची गोव्‍यालाच पसंती! जानेवारी ते जुलैदरम्यान तब्बल 61 लाखांहून अधिक पर्यटकांची भेट

Fake RTO Challan: पार्सलचा बहाणा, चलनाचा धाक! सायबर ठगांचा आर्थिक हल्ला; कॉल फॉरवर्डिंग, एपीके फाइलच्या माध्यमातून गंडा

खरी कुजबुज: गटारी पार्टीत शिजले राजकारण?

SCROLL FOR NEXT