Shapora River Dainik Gomantak
गोवा

Goa: शापोरा नदीला पूर; नागरिकांच्या घरात शिरले पाणी

संतोष चोडणकर (Santosh Chodankar) यांच्या घरात नदीचे पाणी मोठ्याप्रमाणात शिरल्याने त्यांचे बरेच नुकसान झाले.

दैनिक गोमन्तक

मोरजी: सलग पडणाऱ्या धुवाधार पावसाने तिल्लारी धरणाने (Tillari Dam) धोक्याची पातळी ओलांडल्याने धरणातून अचानक सोडलेल्या पाण्यामुळे पेडणे (Pernem) तालुक्यातील नदी तीरावरील गावे पाण्याखाली आली असून अनेकांच्या घरात शापोरा नदीचे पाणी घुसले आहे. शापोरा नदी तीरावर असलेल्या आगरवाडा गावातील खालचा राऊत वाडा येथील गणेश कोंड ( गणपती विसर्जन स्थल) पूर्ण पणे पाण्याखाली गेली आहे यालाच लागून असलेल्या संतोष चोडणकर (Santosh Chodankar) यांच्या घरात नदीचे पाणी मोठ्याप्रमाणात शिरल्याने त्यांचे बरेच नुकसान झाले.

शापोरा नदीच्या तीरावर असलेली मिठागरे तसेच भात शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे त्यामुळे या भात शेतीला सध्या तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याची माहिती आगरवाडा चोपडे पंचायतीचे माजी सरपंच अमोल राऊत आणि शेतकरी नंदकुमार राऊत यांनी प्रस्तुत प्रतिनिधी पाशी बोलताना दिली.येथील भातशेती पाण्याखाली गेल्याने आमचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही या पूरपरिस्थिती ची पाहणी केली आहे परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल की. नाही याची शास्वती अजिबात नाही तरी या भागाचे आमदार दयानंद सोपटे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. शापोरा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आगरवाडा गणेश कोंड येथील संतोष चोडणकर यांच्या घरात घुसलेले नदीचे पाणी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT