A car finds the way through the underwater road in Vasco city (Goa) on Friday,15 July,2021 Dainik Gomantak
गोवा

Goa: मुसळधार पावसामुळे वास्कोसह इतर भागात पूरस्थिती

पालिकेच्या (municipality) नियोजनाअभावी वास्कोतील (Vasco city) नागरिकांचा राग अनावर

दैनिक गोमंतक

काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने (rainy season) वास्को (Vasco) शहराला झोडपून काढले.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. वास्तूतील जवळ-जवळ सर्वच मुख्य रस्त्यांवर पावसाचे पाणी भरून राहिल्याने पूरस्थिती (Flood) निर्माण झाली होती. पण दुपारनंतर पावसाने थोडी उसंत घेतल्याने लोकांना दिलासा मिळाला.

Flood on the streets of Vasco city,on Friday,15 July,2021

काल रात्री व आज सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वास्को शहरासह इतर भागांना अक्षरशः झोडपून काढले. अविरत पडलेल्या पावसामुळे शहरातील तसेच इतर ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते. बऱ्याच ठिकाणी दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पार्क करून ठेवलेली चार चाकी वहाने, दुचाक्या पाण्याखाली जाऊ लागल्या होत्या. तसेच येथील स्वातंत्र पथ मार्ग, एफ एल गोम्स मार्ग तसेच इतर बऱ्याचशा रस्त्यांवर पाणी भरून राहिल्याने वाहनचालकांना भरपूर त्रास झाला. पाण्यातून वाट काढत काढत वाहने पुढे सरकत होती, तर काही ठिकाणी पाण्यात वाहने बंद पडल्याचे पाहायला मिळाले. गटारातील घाण भर रस्त्यावरून वाहत होती. पालिकेतर्फे मान्सूनपूर्व कामे न झाल्याने आज वास्को वासियांना पूरस्थितीचा सामना करावा लागला.

Flood on the streets of Vasco city, on Friday,15 July,2021

गटारांची साफसफाई न झाल्यानेच सदर पूरस्थिती निर्माण झाली.त्यामुळे पालिका कर्मचारी आज जिकडे तिकडे धावाधाव करताना दिसले. मात्र गटारातील कचरा तुडुंब भरलेला असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नव्हता. पाण्याचा योग्यरीत्या निचरा होत नसल्याने संपूर्ण शहर पाण्याखाली गेल्याचे पाहण्यात आले. दरम्यान दुपारी एक नंतर पावसाने उसंत घेतली, तसे रस्त्यावरील पाण्याची पातळी थोडीफार उतरली खरी, मात्र गटारात पाणी तसेच भरलेले होते. कारण गटारांची साफसफाई न झाल्याने गटारातून पाण्याचा निचरा होत नव्हता. आजच्या पूरस्थिती मुळे पालिकेच्या बेभरवशाच्या कमिटीचे धिंडवडे उडाले. संतापलेले नागरिक पालिकेच्या नावाने बोटे मोडताना दिसत होते. वास्को शहरासह बायणा, मायमोळे, वाडे येथेही पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

footpath went under flood water in The Vasco city, on Friday,15 July,2021

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT