Goa Flight Ticket Price Increased | Delhi to Goa Flight Rate Dainik Gomantak
गोवा

Goa Flight Rate: ख्रिसमस, न्यू ईअरच्या तोंडावर हवाई प्रवाशांच्या खिशाला झळ! गोव्याला येण्यासाठी विमान तिकीटे महागली

यंदाचा विमान प्रवास 17 टक्क्यांनी महागला

Kavya Powar

Goa Flight Ticket Price Increased : ख्रिसमस, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. याच कालावधीमध्ये विमान प्रवास, बस प्रवास तसेच हॉटेलच्या दरांमध्ये सुद्धा वाढ होते. गेल्या वर्षीदेखील विमान तिकिटांमध्ये वाढ झाली होती आणि उपलब्ध माहितीनुसार यंदाचा विमान प्रवास 17 टक्क्यांनी महागला आहे.

तर दुसरीकडे देशांतर्गत विमान प्रवास स्वस्त झाला आहे. विमान कंपन्यांनी दिल्ली ते मुंबई, मुंबई ते बेंगळूरू तसेच मुंबई ते चेन्नईच्या तिकीट दरात 24 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये 28 टक्क्यांपर्यंत घट केली आहे.

मात्र दिल्ली-बेंगळूरू, दिल्ली-श्रीनगर सोबतच गोव्याचा विमान प्रवास महागला आहे.

असे आहेत विमान तिकीटांचे दर (24 डिसेंबर ते 01 जानेवारी)

या मार्गावरील प्रवास तिकीटात घट

Goa Flight Rate

या मार्गावरील प्रवास तिकीटात वाढ

Goa Flight Rate

इतर ठिकाणी प्रवास स्वस्त का आहे?

माहितीनुसार, विमान इंधनामध्ये प्रति लिटर 118 रुपयांवरून 106 रुपयांपर्यंत घट झाल्याने एअरलाइन्स कंपन्यांनी विमान तिकीटांचा दर कमी केला.

दिल्ली ते गोव्याचा प्रवास महाग का?

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा हे सर्वांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. यामध्ये इतर प्रमुख शहरांपैकी दिल्ली ते गोवा विमान तिकीट महाग आहे. याचे कारण म्हणजे देशांतर्गत पर्यटकांमध्ये दिल्लीचे पर्यटक गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे दिल्लीचा प्रवास 17 टक्क्यांनी महागला आहे.

डिसेंबर महिन्यात गोव्यात 'या' गोष्टींची मेजवानी..!

ख्रिसमस आणि न्यू ईअर शिवायही या महिन्यात गोव्यामध्ये अनेक इव्हेंट्स असणार आहेत. प्रामुख्याने किनारी भागात विविध डान्स आणि म्युझिक इव्हेंट्स पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

पणजीमध्ये 15 डिसेंबरपासून सेरेंडीपिटी आर्ट्स फेस्टिव्हला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला तऱ्हेतऱ्हेचे कलाविष्कार अनुभवायला मिळतील. सोबतच सनबर्न फेस्टिव्हलही शेवटच्या आठवड्यात असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT