Goa Fishing Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Fish Market: मागील आठवड्याच्या तुलनेत आता मार्केटमध्ये मासळीची आवक वाढल्याने दरही वाढले आहेत. मागील आठवड्यात इसवण हजार रुपये किलो दराने विकला जायचा.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात ११ दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर आता मत्स्य खवय्यांची पावले आपसुकच मासळी बाजाराकडे वळू लागली असून बाजारात विविध प्रकारची मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. मात्र, मासळीचे दर काही प्रमाणात चढेच आहेत.

पणजी बाजारात बांगडे, सुंगटा (कोळंबी), लेपो, वेर्ले, बोंबील, पापलेट, चणक तसेच इसवण (सुरमई) आदी मासळीची आवक वाढली असून सुरमई ८०० ते ९०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे तर चांगले मध्यम आकाराचे बांगडे ३०० रुपये किलो दराने विकले जात आहेत.

मासळी विक्रेते काहीजण वाट्याद्वारे तर काही विक्रेते किलोच्या दराने मासळी विकत आहेत. मोठी कोळंबी ५०० रुपये व मध्यम आकाराची कोळंबी ३०० रुपये प्रतिकिलो दराने, वेर्ले ४०० रुपये आणि माणके ३५०-४०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

अजूनही दर घटणार!

मागील आठवड्याच्या तुलनेत आता मार्केटमध्ये मासळीची आवक वाढल्याने दरही वाढले आहेत. मागील आठवड्यात इसवण हजार रुपये किलो दराने विकला जायचा; परंतु आता मासळीचे दर कमी होत असून येत्या आठवड्यात अजूनही दर घटण्याची शक्यता विक्रेते व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT