Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: शाळांमध्ये रोबोटिक शिक्षण देणारे गोवा पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची माहिती

गोव्याच्या दिष्टावो चॅनेलवरून 1 ली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे शिक्षण

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक एज्युकेशन, इनोव्हेशनमध्ये गोवा पहिल्या क्रमांकावर आहे. रोबोटिक एज्युकेशन देणारे गोवा हे पहिले राज्य आहे. सर्व शाळांनी सहावीच्या वर्गात हा विषय आम्ही लागू केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शनिवारी अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, रोबोटिक क्षेत्रात विद्यार्थी खूप चांगले काम करत आहेत. गोव्यातील सहा विद्यार्थ्यांची निवड सिंगापूरमधील रोबोटिक स्पर्धेसाठी झाली आहे. म्हणजे गोव्याची मुले आता देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, धोरणे ठरली तरी त्याची अंमलबजावणी शिक्षक आणि पालकांवर अवलंबून असते. शिक्षण क्षेत्रात गोव्याचे नाव आघाडीवर घेतले जाते. देशात राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत उत्साही वातावरण आहे. प्रत्येक राज्य त्यावर काम करत आहे.

त्यात एकसूत्रीपणा असावा यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. ट्रेनिंग वर्षभर सुरू राहणार आहे. शिक्षकांनी हे ट्रेनिंग नीट घेतले तर राष्ट्रीय शिक्षण पॉलिसी तळागाळापर्यंत पोहचेल. भविष्यात काहीही गरज लागली तर सरकार त्यासाठी तत्पर आहे.

प्रत्येक शाळेत निपुण सेल कार्यरत आहे. निपुण सेल मार्फत आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. दिष्टावो नावाचा चॅनेल सुरू केले. देशात प्रथमच गोव्यात हे झाले आहे. त्या मार्फत पहिले ते तिसरीपर्यंतचे सर्व लेक्चर्स व्हिडिओ रेकॉर्डिंग केले गेले आहे. प्रसाद लोलयेकर यांचे यात मोठे योगदान आहे. या चॅनेलची देशभरात दखल घेतली गेली.

ते म्हणाले, तीन ते पाच वर्षांपर्यंत पुस्तक आणि पेनची गरज नाही. त्यासाठीच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. शारिरीक विकास, मानसिक विकास आणि आध्यात्मिक विकास साधायचा आहे. केवळ पोपट तयार करायचे नाहीत.

करीयरमध्ये हे विद्यार्थी यशस्वी ठरले पाहिजेत. त्यासाठी सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. त्यासाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण महत्वाची भूमिका पार पाडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT