Mormugao
Mormugao  Dainik Gomantak
गोवा

Goa First NGO: मुरगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव नगरपालिकेसमोर फुलझाडे विक्रेत्याला पदपथावर अतिक्रमण करण्यास परवानगी दिल्याबद्दल पालिका मुख्याधिकारी आणि पालिका निरीक्षक यांच्या विरोधात 1997 च्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने तक्रार दाखल केली आहे.

( Goa First NGO filed complaint against Mormugao municipal officials)

रोपवाटिका विक्रेत्यांनी दोन महिन्याहून अधिक काळ मुरगाव पालिकेसमोर फुटपाथवर अधिक्रमण केले असून त्यामुळे पादचारी आणि प्रवाशांना त्रास होत आहे. तसेच या विक्रेत्याने फुल झाडांची माती येथील गटारात टाकल्याने गटार मातीने भरले आहे. त्यामुळे गेले चार दिवस पडत असलेल्या पावसाने येथील रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच पालिका आवारातही पाणी तुडुंब भरून घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

दरम्यान या अतिक्रमणाविरोधात गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने पालिकेने 1997 च्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल व पदपथावर अतिक्रमण करण्यास परवानगी दिल्याबद्दल पालिका मुख्याधिकारी आणि पालिका निरीक्षक यांच्या विरोधात पालिका संचालकाकडे तक्रार केली आहे.

या तक्रारीत त्यांनी मुरगाव पालिका इमारतीसमोर मुख्याधिकारी आणि मुरगाव पालिका निरीक्षक या विक्रेत्यांशी हात मिळवणी करीत असल्याचे म्हटले आहे. या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करून मुख्याधिकारी व नगरपालिकेच्या निरीक्षकावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान पालिकेसमोर फुटपाथवर बिगर गोमंतकियाला फुलझाडे विक्री करण्यास परवानगी दिल्याबद्दल येथील गोमंतकीय व्यावसायिक जे रस्त्यावर बसून आपला व्यवसाय करणाऱ्या महिला विक्रेत्यांनी पालिकेच्या कारभारावर आक्षेप व्यक्त केला आहे. कारण या फळभाजी विक्रेत्यांना रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून हल्लीच पालिकेने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जुन्या मासळी मार्केटमध्ये हलवण्यात आले होते.

मात्र तिथे त्यांना फायदा होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. आम्हाला अतिक्रमणाच्या नावाने पालिकेने कारवाई करून हटविले, मात्र या बिगर गोमंतकियांना कोणत्या आधारावर फुटपाथवर व्यवसाय करण्यास पालिकेने परवानगी दिली, असा सवाल या विक्रेत्यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT