Goa First Fish Dryer: Dainik Gomantak
गोवा

Goa First Fish Dryer: गोव्यात काही तासात मिळणार सुके मासे; नाममात्र शुल्क

मडगाव कृषी विज्ञान केंद्रात सोलर इलेक्ट्रिक हायब्रीड फिश ड्रायरचे अनावरण

Akshay Nirmale

Goa First Fish Dryer: पारंपरिक मच्छीमार ऑगस्ट महिन्यात सूर्यप्रकाशाअभावी मासे सुकवू शकत नसल्यामुळे त्यांना अडचणी येतात. यावर उपाय म्हणून आता कृषी विभागाने मडगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात सौर विद्युत संकरित फिश ड्रायर बसवला आहे.

जेथे पारंपरिक मच्छीमार किंवा कोणीही सामान्य माणूस मासे घेऊन काही तासांत सुके मासे घेऊन घरी जाऊ शकतो.

कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्सो म्हणाले की, सौर विद्युत संकरित फिश ड्रायर हे पारंपरिक मच्छीमारांना किंवा कोणत्याही सामान्य नागरिकाला पावसाच्या काळातही मासे सुकवण्यास मदत करेल.

आम्हाला मासेमारीच्या हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत सूर्यप्रकाशाअभावी मासे वाळवता येत नाहीत, परिणामी मासे एकतर कुजतात किंवा फिश मील प्लांटमध्ये पाठवले जातात. फिश ड्रायरने यात बदल घडला आहे. यात मच्छीमार किंवा कोणताही नागरिक त्यांचे मासे वर्षभर सुकवू शकतात.

ते म्हणाले, “पारंपरिकपणे मच्छीमार स्त्रिया त्यांचे मासे खुल्या कोरड्या आवारात आणि खुल्या समुद्रकिनाऱ्यावर वाळवतात जिथे योग्य स्वच्छता राखणे शक्य नसते. वाळू, धूळ, पक्षी, प्राणी आणि अतिक्रमण करणाऱ्यांमुळे वारंवार प्रदूषण होते.

म्हणून, कृषी विज्ञान केंद्र दक्षिण गोवा, मडगाव येथे RKVY-AFTAAR प्रकल्पांतर्गत जलसंवर्धन आणि मत्स्यपालनासाठी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक युनिट स्थापन करण्यासाठी सौर विद्युत संकरित फिश ड्रायरची स्थापना करण्यात आली आहे.”

हे तंत्रज्ञान ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी, कोचीन यांनी विकसित केले आहे. सोलर ड्रायरची क्षमता प्रति ऑपरेशन 100 किलो मासे/कोळंबी आहे. वाळवण्याची वेळ माशांच्या ओलावा आणि पृष्ठभागाच्या क्षेत्रानुसार 4 ते 10 तासांपर्यंत बदलते. मॅकेरल फिश (बांगडा) सुकविण्यासाठी 8-10 तास लागतात.

मडगाव येथे बसविण्यात आलेल्या सोलर ड्रायरचा उपयोग मच्छिमार महिलांना प्रात्यक्षिक, प्रशिक्षण देण्यासाठी केला जाणार आहे. तसेच मच्छीमार महिलांना केव्हीके ड्रायरमध्ये मासे सुकवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

सौर ड्रायरच्या फायद्यांची रूपरेषा सांगताना कृषी संचालक म्हणाले की रंग आणि चव न बदलता अनुकूल हवामानात सौर ऊर्जेचा वापर करून पर्यावरणास अनुकूल पद्धतीने मासे स्वच्छ कोरडे केले जातात. यातून मच्छीमारांना जास्त उत्पन्न मिळणार आहे. इको-फ्रेंडली सोलर ड्रायिंग सिस्टममुळे ऊर्जेचा वापर कमी होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT