देस्तेरो मुरगाव (Murgaon) येथे स्वस्त धान्य दुकानातून होत असलेला धान्याचा काळाबाजार. Dainik Gomantak
गोवा

गोवा फर्स्टकडून मुरगावातील स्वस्त धान्य दुकानातून होणारा काळाबाजार उघड

परशुराम सोनुर्लेकर (Parashuram Sonurlekar) यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता मुरगाव येथील देस्तेरो ब्यूझी बी स्कूल जवळ असलेल्या नागरी पुरवठा संस्थेच्या अंकुश रेडकर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून एक दुचाकी चालक आपल्या दुचाकीवर पन्नास किलो वजनाचे दोन तांदळाच्या पिशव्या घालत असल्याचे दृष्टीपथास पडले.

दैनिक गोमन्तक

वास्को: 'गोवा फर्स्ट'(Goa First) या स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर (Parashuram Sonurlekar) यांनी मुरगाव (Murgaon) येथील देस्तेरो ब्यूझी बी स्कूल जवळ एका स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा होणारा काळाबाजार उघड केला. तसेच याविषयी त्याने स्वस्त धान्य दुकान मालकाविरुद्ध नागरी पुरवठा खात्यात तक्रार दाखल केली आहे.

परशुराम सोनुर्लेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता मुरगाव येथील देस्तेरो ब्यूझी बी स्कूल जवळ असलेल्या नागरी पुरवठा संस्थेच्या अंकुश रेडकर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून एक दुचाकी चालक आपल्या दुचाकीवर पन्नास किलो वजनाचे दोन तांदळाच्या पिशव्या घालत असल्याचे दृष्टीपथास पडले. या कामी त्याला स्वतः मालक मदत करताना त्याला दिसले असता सोनुर्लेकर यांनी त्याचे व्हिडीओ चित्रण केले. नंतर दुचाकी चालकाने आपली दुचाकी चालू करून पुढे आला असता त्याला अडवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे धान्य रेशन कार्ड शिवाय या स्वस्त धान्य दुकानातून काळा बाजारातून खरेदी केले असल्याचे सांगितले. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोनुर्लेकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून स्वस्त धान्य दुकानदार मुरगाव तालुक्यातील घाऊक विक्रेत्यांना अन्नधान्याची बेकायदेशीर विक्री करत असल्याचा पोल-खोल केला. तसेच याविषयी त्याने लेखी तक्रार देखील नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात केली असून स्वस्त धान्य दुकान मालकावर कारवाई करण्यात यावी असे सांगितले. तसेच मुरगाव तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानातून महिन्याच्या २१ तारखेला किती साठा विक्रीस केला व किती बाकी आहे याचा अहवाल घेण्यात यावा असे सुचविले. कारण सदर दुकानदार महिन्याच्या 21 तारखेला दुकान बंद करून पुढचे दहा दिवस आपल्या दुकानातील धान्याचा काळाबाजार करण्यास व्यस्त असल्याचे सोनुर्लेकर म्हणाले. सरकार कडून हा धान्य कोटा गरीब जनतेसाठी उपलब्ध करून दिला जातो. मात्र सदर स्वस्त धान्य दुकानदार या धान्याचा काळाबाजार करून घाऊक विक्रेत्याना त्या धान्याची विक्री करुन जास्त पैसे वसूल करून घेतात. हा गरीब जनतेवर अन्याय असून सरकारने यावर त्वरित लक्ष घालावे, तसेच नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनीही यावर त्वरित लक्ष घालून असल्या बेजबाबदार काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकान मालकावर कारवाई करावी असे सोनुर्लेकर यांनी शेवटी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT