Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

Goa First Alliance Latest News: ‘गोवा फर्स्ट’ नावाने तयार होणारी ‘आघाडी’ भाजपच्या हातातील प्याद्यासारखे काम करत असल्याचे दिसते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘गोवा फर्स्ट’ नावाने तयार होणारी ‘आघाडी’ भाजपच्या हातातील प्याद्यासारखे काम करत असल्याचे दिसते. कदाचित आम आदमी पार्टी(आप)ने पंजाबमधील धर्तीवरच या ‘एक्सचेंज ऑफर’चा करार केला असावा. त्यानुसार पंजाबमध्ये भाजप ‘आप’ला जिंकण्यास मदत करेल, तर गोव्यात ‘आप’ भाजपला सरकार स्थापन करण्यात किंवा टिकवण्यात मदत करेल, असा उपरोधिक टोला गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी लगावला आहे.

खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चोडणकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘गोवा फर्स्ट’ ही आघाडी किंवा युती, गोवा फॉरवर्ड-‘आप’ आणि इतर पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने आकारास येत आहे. त्यावर चोडणकर यांनी जोरदार टीका केली आहे.

विरोधी पक्षांनी एकत्रित आघाडी करावी, अशी गोव्यातील जनतेची इच्छा होती. मात्र, गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ने त्या इच्छेच्या विरोधात जाऊन पावले उचलली आहेत. त्यांना एकही जागा जिंकता येणार नाही; ही त्यांची ‘गोवा लास्ट’ (गोवा सर्वात शेवटी) अशी निवडणूक ठरेल, असे चोडणकर यांनी सांगितले.

चोडणकर पुढे म्हणाले की, ‘कोविड’च्या काळात ‘हमे बिमारी से लढना है, बिमार से नही’ हा धडा आम्ही शिकलो आहे. भाजप हा रोग आहे आणि ‘आप’-‘जीएफपी’ हे रोगी आहेत. मी फातोर्डा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी विनंती करणारे फोन आपल्याला मतदारांकडून येत आहेत; परंतु काँग्रेस फातोर्डा मतदारसंघात एका सक्षम उमेदवारासह विजयाच्या उद्देशानेच निवडणूक लढवेल. लोकांकडून फ्रान्सिस सार्दिन, कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि युरी आलेमाव यांच्यासह अनेक नावांची शिफारस केली जात आहे.

निर्णय संयुक्त युतीद्वारेच!

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ‘जीएफपी’सोबत युतीचे निर्देश दिले तर पुढे काय? या प्रश्नावर प्रसारमाध्यमांना चोडणकर यांनी सांगितले की, काँग्रेस आणि ‘आरजी’च्या युतीविषयक समित्यांनी निर्णय घेतला आहे. जर एखाद्या पक्षाला या युतीत सामील व्हायचे असेल, तर त्याबाबतचा निर्णय संयुक्त युतीद्वारेच घेतला जाईल. ‘आरजी’ आणि ‘काँग्रेस’ यावर निर्णय घेतील आणि त्यानंतर आम्हाला आमच्या संबंधित पक्षश्रेष्ठींना (हाय कमांडला) त्याबद्दल माहिती द्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT