Goa Fire News Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: रिवण मार्केटमधील दुकान जळून खाक; तर शिगावातील कचरा शेडला आग

कुडचडे अग्निशमन दलाने आग विझवण्याचे काम केले

Kavya Powar

Goa Fire News: रिवण मार्केट येथे काल रात्री एका हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुकान संपूर्णपणे जळून खाक झाले आहे.

या आगीत तिथेच असलेल्या इतर तीन दुकानांचेही नुकसान झाले असून सदर इमारत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे इतर दुकानमालक आपले सामान तिथून हलवत आहेत.

संबंधित घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त मालकांची भेट घेतली. आगीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. कुडचडे अग्निशमन दलाने आग विझवण्याचे काम केले

दरम्यान, अजून एक आगीची घटना शिगाव येथे घडली आहे. कुळे शिगाव पंचायत परिसरात असलेल्या कचरा शेडला अज्ञातांनी रात्रीत आग लावली. आगीची माहिती मिळताच कुडचडे अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवली असली तरी यामध्ये अनेक मशीनरी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत एक कोटीच्या वर नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT