Goa fire department Dainik Gomantak
गोवा

Goa fire department : ‘अग्निशमन’कडून वर्षभरात 103 जणांना जीवदान

761 जनावरांचे प्राण, 89.40 कोटीची मालमत्ता ही वाचवण्यात दलाला यश

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa fire department : सरकारच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या जवानांनी जानेवारी ते डिसेंबर 2022 दरम्यान तब्बल 103 जणांना वाचवले असून 761 जनावरांचे प्राण वाचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

89.40 कोटीची मालमत्ता ही वाचवण्यात यश मिळवले, अशी माहिती संचालनालयाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली. पणजीत आज अग्निशमन दलाची 35 वी तपासणी परेड संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य सचिव डॉ. पुनीतकुमार गोयल उपस्थित होते.

ध्वजारोहण, मानवंदना, संचालनाची पाहणी आणि जवानांच्या प्रात्यक्षिकानंतर संचालनालयाचा 35 वा तपासणी परेड संपन्न झाली. यावेळी गेल्या वर्षभरात विशेष कामगिरी केलेल्या जवानांचा सन्मान करण्यात आला. तर खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरणही झाले.

‘ना हरकत’साठी अडवणूक नको

मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी जलद प्रतिसाद (क्विक रिस्पॉन्स) देण्यामध्ये हे खाते तत्पर बनले आहे. त्याच पद्धतीने गोव्यात ही जलद प्रतिसाद मिळाला पाहिजे. याकडे संचालनालयाने लक्ष द्यावे.

उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेले `ना हरकत ’दाखले वेळेत मिळत नाहीत, अशी तक्रार असते उद्योग क्षेत्रासाठी खात्याने या दाखल्यांकरता विलंब लावू नये, असे आवाहन पुनीत कुमार गोयल यांनी केले.

जवानांचा सन्मान

या परेड कार्यक्रमात संतोष गावस वाळपई, राजेश तलवार, संतोष गावकर - फोंडा, सिताराम कामत मुख्यालय, अशोक नाईक- वाळपई, दामोदर नाईक - वास्को, सिद्धेश वारंग, मुख्यालय, जयराम मुळगावकर-मुरगाव, योगेश्वर पाटील - फोंडा आणि जितेंद्र नाईक -म्हापसा यांचा सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT