Goa Fire Brigade Dainik Gomantak
गोवा

अग्निशमन दलाकडून गोव्यात रोज तिघांना जीवदान!

कोट्यवधींची मालमत्ता सुरक्षित; 271 व्यक्ती आणि 632 जनावरांना वाचविले

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात आग विझविण्याबरोबरच मानवी सुरक्षा आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाने गेल्या वर्षभरात केलेले कार्य लक्षणीय आहे. या खात्याच्यावतीने दररोज 3 जीवांना वाचविण्यात यश आले असून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचविली आहे.

या क्षेत्रात सेवा बजावताना धारातीर्थी पडलेल्या जवानांचे स्मरण करण्याबरोबर नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून अशा दुर्घटना कशा टाळता येतील किंवा कमी करता येतील यासाठी आज देशभर राष्ट्रीय अग्निशमन (Fire Brigade) दिवस पाळला जातो. या सेवा संचालनालयाच्यावतीने एप्रिल 2021 ते मार्च 2022 या वर्षभरात उल्लेखनीय कार्य केले आहे. या विभागाकडे आलेले 4 हजार 439 कॉल अटेंड करण्यात आले. यापैकी 1 हजार 923 दुर्घटना (Accident) स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन 271 व्यक्तींना आणि 632 जनावरांना जीवदान दिले. याबरोबरच 52 कोटी 80 लाख रुपयांची जंगम मालमत्ता वाचविण्यात या सेवा संचालनालयाला यश आले आहे, अशी माहिती संचालक नितीन रायकर यांनी दिली आहे.

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाकडे 1106 कर्मचारी असून त्यापैकी 714 कर्मचारी कार्यरत आहेत. या विभागातील कामाचा भार लक्षात घेता 571 रिक्त जागा भराव्या लागतील. त्या भरण्यासाठी विभागाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. यापैकी 200 अग्निशमन जवानांची तातडीची गरज आहे. 3 विभागात कार्यरत असलेल्या या विभागाचा उत्तर विभाग पणजीत, दक्षिण विभाग मडगावात (Madgaon), तर फोंडा येथे मध्य विभाग कार्यरत आहे. अग्निशमन दलाकडे 77 वाहने असून 1 एरियल लॅडर प्लॅटफॉर्म असणारे आधुनिक वाहन, तर 2 टर्न टेबल लॅडर वाहन असून अजून 2 टर्न टेबल लॅडर वाहनांची आवश्यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT