Nitin Rayakar  Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Brigade: अग्निशमन दल 'हायटेक' बनणार! 'या' अत्याधुनिक यंत्रणांची संचालकांनी दिली माहिती

Goa Fire Brigade: संचालक नितीन रायकर यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Fire Brigade: राज्यात आग, सिलिंडर स्फोटासारख्या घटना घडत असून या घटनांमध्ये वित्त हानीसह मानवी हानी होण्याचेही प्रमाण वाढले आहे.

राज्यातील आगीच्या घटनांना आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दल कसोशीने प्रयत्न करते मात्र काही ठिकाणं अशी असतात की ज्याठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला तेथे बचावकार्य करणे आव्हानात्मक होते.

तसेच काही आगीच्या दुर्घटनांमध्ये बचावकार्य करणे धोकादायक होते अशा परिस्थितीत सुरक्षित अंतरावरून आग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल रिमोट सेन्सिंग फायर फायटिंगसारख्या अत्याधुनिक सुविधांसह हायटेक बनणार असल्याची माहिती संचालक नितीन रायकर यांनी दिली.

गोवा राज्य अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये आगी लागण्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन यंत्रणा असून लवकरच रिमोट सेन्सिंग फायर फायटिंग ही अत्याधुनिक यंत्रणा ग्निशमनकडे दाखल होणार आहे. यामुळे अग्निशमन दल जलदगतीने काम करू शकणार आहेत.

या अत्याधुनिक मशिनरीमुळे जळत्या इमारतीत पाण्याचा मारा करण्यासाठी पाइप वाहून नेण्यासाठी अग्निशामकाची आवश्यकता भासणार नाही. तसेच ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आगीपासून सुरक्षितस्थळी जाऊन दुरून ही मशिनरी चालवू शकतात.

पिळर्ण येथील बर्जर कंपनीत लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे ठरवले असल्याचे रायकर यांनी सांगितले.

गॅस गळती झाल्यास

अलीकडील आगीच्या घटनांबाबत अग्निशमनचे संचालक रायकर यांनी जनतेला सल्ला दिलाय. गॅस गळती झाल्यास ते नियंत्रणात आणण्यासाठी घाई करू नका. गळती झाल्यास घाबरू नका.

फक्त घराबाहेर पडा, सिलिंडरपासून अंतर ठेवा आणि अग्निशमन दलाला कॉल करा. हे करत असताना लिकेजच्या जवळ मोबाईल फोन नेऊ नका तसेच लगतचा इलेक्ट्रिकल स्विच बंद करा असा सल्लाही रायकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT