सांकवाळ पंचायत क्षेत्रात तोक्ते वादळात नुकसानग्रस्तांना आर्थिक सहकार्य भेटविण्याच्या कार्यक्रमात पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सरपंच रमाकांत बोरकर व इतर Dainik Gomantak
गोवा

Goa: चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत

साकवाळ पंचायत क्षेत्रातील चक्री वादळाने नुकसान झालेल्या कुटुंबांना पंचायतीतर्फे आर्थिक सहकार्य करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: भारतात समुद्रकिनाऱ्याजवळील राज्यांना तोक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) तडाख्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले होते. गोव्यात (Goa) सुद्धा तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यात नुकसान झालेल्यांना राज्य सरकार बरोबर स्थानिक पंचायतीने आर्थिक सहकार्य केली आहे. साकवाळ पंचायत क्षेत्रातील चक्री वादळाने नुकसान झालेल्या कुटुंबांना पंचायतीतर्फे आर्थिक सहकार्य करण्यात आले.

साकवाळ पंचायत क्षेत्रातील घरांना तोक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. यात अनेकांच्या घरावर झाडाच्या मोठ्या फांद्या, विजेचे खांब पडल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले होते. तोक्ते वादळाने साकवाळ भागालासुद्धा तडाखा दिल्याने सरपंच रमाकांत बोरकर व इतर पंच सदस्यांनी जातीने लक्ष देऊन नागरिकांची सेवा केली होती. तसेच साकवाळ पंचायत सचिवांमार्फत नुकसान झालेल्या घराची पाहणी करून त्यांना आर्थिक सहकार्य देण्याचे आश्वासन सरपंच बोरकर यांनी दिले होते.

साकवाळ पंचायत क्षेत्रात तोक्ते चक्रीवादळातून वादळाने नुकसान झालेले रहिवाशी खालील प्रमाणे. विशाल गाड, वैकुंठ नाईक, जोस फर्नांडिस, पुष्पा नाईक, सुशांत नाईक, अंतोनिओ सावीयो, आरावजो, अनिल हळदणकर, अमिता उमेश नाईक, भोजो नागू नाईक, मुरलीधर नाईक, लतिका विश्वनाथ नाईक, कमला नाईक, तुकप्पा लमाणी, शंकर लमाणी, रोझालीना मोनीज, तारासिंग लमाणी, जासिन्तो डिक्रूज, कमलादेवी यादव, वीरेंद्र कुमार त्रीपाठी, कामिलो फर्नाडिस, राजू नाईक यांना आर्थिक सहकार्य पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत भेटविण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत सरपंच रमाकांत बोरकर, उपसरपंच सुकोरीना वालीस, पंचक गिरीश पिल्ले, गोविंद लमाणी, हरीश कादर, नंदिनी देसाई, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, लिगोर मोंन्तेर, सचिव कृष्णा गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT