दाबोळी : उत्तर भारतीयांचा प्रमुख सण (Goa Festival) "छटपूजा". आज वास्कोत (Vasco) बायणा समुद्रकिनाऱ्यावर उत्तर भारतीयातर्फे उत्साहात तसेच भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.गेली दोन वर्षे कोरोना (Corona) महामारी मुळे या उत्सवावर विरजण पडले होते. यंदा ती उणीव उत्तर भारतीयांतर्फे भरुन काढण्यात आलेली पाहण्यात आली. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक तसेच माजी नगरसेवक कृष्णा साळकर यांनी खास उपस्थिती लावून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
वर्ष पद्धती प्रमाणे यंदाही बायणा समुद्रकिनाऱ्यावर वास्को शहरात तसेच इतर भागात स्थायिक असलेल्या उत्तर भारतीयांतर्फे छटपूजा केली. आज संध्याकाळी बायणा समुद्रकिनाऱ्यावर जत्रेचे स्वरूप आले होते. दुपारी तीन वाजल्यापासून उत्तर भारतीय सौभाग्यवती महिला डोक्यावर उस तसेच कळस घेऊन बायणा समुद्रकिनार्यावर जाताना दिसत होत्या. साडेचार वाजेपर्यंत बायणा समुद्रकिनाऱ्यावर जत्रेचे स्वरूप आले होते. सौभाग्यवती महिलांतर्फे समुद्रकिनाऱ्यावर रेतीत ऊस उभे करून पाण्यात उभे राहून सूर्यदेवाची पूजा केली. उद्या पहाटे परत सूर्यदेवाची पूजा करून या छटपूजेची सांगता करणार आहे. सौभाग्यवती महिलांतर्फे दोन दिवस उपवास धरून सूर्य देवाची उपासना करतात. दरम्यान छटपूजेला बायणा समुद्रकिनाऱ्यावर नगरविकास मंत्री मिलिंद नाईक व माजी नगरसेवक कृष्णा साळकर यांनी खास उपस्थिती लावून उपस्थित उत्तर भारतीयांना छटपूजेच्या शुभेच्छा दिल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.