Goa health News Dainik Gomantak
गोवा

Goa Fertility Rate: बाल आरोग्यामध्ये सर्वोत्तम असलेल्या गोव्यात प्रजननाचा आकडा मात्र ठरतोय चिंताजनक!!

Reproductive Rate in Goa: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने सादर केलेल्या डेटाच्या आधारित गोव्यातील प्रजननाचा दर १.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे

Akshata Chhatre

पणजी: गोवा बाल आरोग्यामध्ये प्रगती करत असतानाच एक धक्कादायक बातमी उघड झाली आहे. राज्यात वेगाने घटणारा प्रजननाचा आकडा येणाऱ्या काळात एक चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) ने सादर केलेल्या डेटाच्या आधारित गोव्यातील प्रजननाचा दर १.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

गोव्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रजननाचा आकडा घटत चालला आहे. वर्ष १९९२-९३ मध्ये १.९ टक्क्यांवरून हाच आकडा १९८८-९९ ते २००५-०६ पर्यंत १.८ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचला. यानंतर वर्ष २०१५-१६ मध्ये गोव्यातील प्रजननाचा आकडा १.७३ टक्क्यांवर पोहोचला होता आणि सध्या त्याने १.३ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यात अचानक झालेली ही घट राज्यातील भविष्यात येणाऱ्या संभाव्य चिंतांना अधोरेखित करते. गोव्यात सध्या लक्षणीय कमी होणाऱ्या प्रजननाच्या दरामुळे येत्या काही वर्षात लोकसंख्येचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे वृद्धत्वाची लोकसंख्या आणि संबंधित आर्थिक आणि सामाजिक आव्हाने उद्भवू शकतात.

बाल आरोग्यामध्ये सध्या गोवा उत्तम कामगिरी बजावतोय. बालमृत्यू आणि पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर नियंत्रित करण्यात केरळनंतर गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोव्यातील बालमृत्यूचे प्रमाण सध्या ५.६ टक्के आहे आणि वर्ष १९९२-९३ मध्ये असलेल्या ३१.९ टाक्यांवरून गोव्याने ही लक्षणीय घट करून दाखवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT