Goa Ferry Boat :  Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat : सारमानस फेरी धक्क्याचा मुद्दा ऐरणीवर: प्रवाशांची मागणी

Goa Ferry Boat: उतरणी कापून रस्ता रूंद करावा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Ferry Boat : डिचोली, चार दिवसांपूर्वी सारमानस फेरीबोट धक्क्यावरील दुर्घटनेनंतर हा फेरीधक्का पुन्हा एकदा चर्चेत आला असून तेथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दिवसेंदिवस असुरक्षित आणि धोकादायक बनणाऱ्या सारमानस फेरी धक्क्यावरील अपघात टाळण्यासाठी या फेरी धक्क्यावर आवश्यक त्या उपाययोजना करा, अशी मागणी आता पुढे येत आहे. गेल्या मंगळवारी एका अनपेक्षित घटनेत सारमानस फेरी धक्क्यावर एका कारचालक युवकाचा बळी गेला आहे.

ही घटना आणि त्यापूर्वी गेल्या काही वर्षातील घटनांमुळे या फेरी धक्क्यावरील भीती दिवसेंदिवस वाढत आहे. सारमानस फेरी धक्क्याकडे जाणारा रस्ता आधीच अरुंद आहे. बऱ्याचदा फेरीबोटीत प्रवेश मिळवण्यासाठी वाहनचालकांमध्ये शर्यत लागते.

फेरी धक्क्याकडे जाताना एखादेवेळी वाहनाचा ब्रेक निकामी झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळच्यावेळी सारमानस फेरी धक्क्यावर गृहरक्षक तैनात करून वाहनांवर नियंत्रण आणण्यात येत आहे. हा अपवाद सोडल्यास या फेरी धक्क्यावर सुरक्षिततेच्यादृष्टीने अन्य कोणत्याच उपाययोजना नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल’च्या तारखा जाहिर! गोमंतकीय अस्मितेचे जागतिक दर्शन; देशभरातून विविध संत-महंत होणार दाखल

Rivona Temple Theft: गोव्यात आणखी एका मंदिरात दिवसाढवळ्या चोरी! केवण-रिवण येथील देवीच्या अंगावरील दागिने पळवले

Bondvol Lake: बोंडवेल तलावाला संरक्षण कवच! 200 मीटरमध्ये बांधकामास परवानगी नाही; मंत्री राणेंचे स्पष्ट निर्देश

Panaji Municipal Election: भाजप पॅनलचे 50% नवे चेहरे! दामू नाईकांचे स्पष्टीकरण; यादी निश्चितीची प्रक्रिया अजूनही सुरू

Suryakumar Yadav: 'शून्य'वर अभिषेक आऊट झाला आणि..! कॅप्टन सूर्याने सांगितले टीमच्या यशाचे गुपित; ईशान किशनबाबत म्हणाला की..

SCROLL FOR NEXT