FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: दिल्लीहून गोव्यात आलेले 1,470 किलो चिकन जप्त! अयोग्य तापमान अन् कागदपत्रांचा अभाव; 3.67 लाखांचा माल नष्ट

Goa FDA Chicken Seizure: सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता आणि पुरेशा थंड वातावरणात न ठेवता वाहतूक करण्यात येणारे सुमारे १,४७० किलो चिकन अन्न व औषध प्रशासनाने मडगाव आणि नावेली परिसरात जप्त केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता आणि पुरेशा थंड वातावरणात न ठेवता वाहतूक करण्यात येणारे सुमारे १,४७० किलो चिकन अन्न व औषध प्रशासनाने मडगाव आणि नावेली परिसरात जप्त केले. हा माल दिल्लीहून रेल्वेमार्गे मडगावला आणल्याचे चौकशीत समोर आले आहे.

या जप्त केलेल्या चिकनची किंमत ३.६७ लाख रुपये असून एफडीए अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. योग्य तापमानात साठवणूक न करता आणि आवश्यक कागदपत्रे व लेबलविना या चिकनची वाहतूक करण्यात येत होती. अशाप्रकारे चिकनची वाहतूक करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दक्षिण गोवा नियुक्त अधिकारी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटेपासून तपासणी मोहीम राबविण्यात आली. अन्य राज्यांतून गोव्यात आणल्या जाणाऱ्या मांसाची साठवणूक, वाहतूक आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी हा या मोहिमेचा उद्देश होता, असे कुडाळकर यांनी सांगितले.

कर्नाटक नोंदणीच्या (केए-६३-ए-७०१६) क्रमांकाच्या खुल्या पिकअप वाहनातून सुमारे ७०० किलो चिकन वाहून नेले जात असल्याचे आढळले. चिकनची वाहतूक योग्य साठवणूक व्यवस्थेविना केली जात होती. मालावर अनिवार्य लेबलही नव्हते. चालकाला योग्य चलन आणि एफएसएसएआय परवाना सादर करता आला नाही. या चिकनची अंदाजित किंमत १ लाख ७५ हजार रुपये होती.

दोन्ही ठिकाणचा माल गोवा पोल्ट्री दुकानदार संघटनेच्या मदतीने नष्ट करण्यात आला. या मोहिमेत इतर तीन मांसवाहू वाहनांचीही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये इन्सुलेटेड वाहतूक व्यवस्था आढळली. फ्रोझन चिकन असले तरी त्याची साठवणूक आणि वाहतूक योग्य तापमानात न झाल्यास अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केवळ चिकन गोठवलेले आहे म्हणून ते सुरक्षित असेलच असे गृहीत धरणे धोकादायक ठरू शकते, असे एफडीए सूत्रांनी सांगितले.

नियम सर्रास धाब्यावर

दुसऱ्या घटनेत जीए-०८-व्ही-७४२१ क्रमांकाच्या रिक्षातून नेण्यात येणारे सुमारे ७७० किलो चिकन नावेली येथे ताब्यात घेण्यात आले. वाहतुकीदरम्यान आवश्यक तापमान राखले गेले नव्हते, तसेच लेबलिंगच्या नियमांचेही पालन झाले नव्हते. या मालाची किंमत सुमारे १ लाख ९२ हजार ५०० रुपये होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार! 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

Goa Politics: 'पणजीतूनच निवडणूक लढवणार, भाजपमध्येच राहणार'; उत्पल पर्रीकरांच्या संभाव्य घरवापसीवर बाबूश यांची स्पष्ट भूमिका

Horoscope: कोजागरी पौर्णिमेला चमकणार 'या' 5 राशींचं नशीब! अचानक मिळू शकते गुड न्यूज, आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

IND vs NZ T20I Series: भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी बातमी! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर, कोणाला मिळणार संधी?

Sandalwood Tree: स्वतः झिजून जगाला सुगंध देणारा चंदनवृक्ष! 40 ते 50 वर्षांच्या वाढीमागचं निसर्गाचं अद्भुत रहस्य

SCROLL FOR NEXT