Margao Municipal Council | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: मडगावसह फातोर्ड्यातील करबुडवे दुकानदार रडारवर; दुकानादारांना नोटिस

Goa News: शहरातील करबुडव्या दुकानादारांना नोटिस पाठविली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: मडगाव,फातोर्डा परिसरातील 30 टक्क्यांपेक्षा अधिक दुकाने विक्री परवाना नसतानाच चालू असून त्यामुळे मडगाव पालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागले, परंतु आत्ता सोमवारपासून कर वसुलीची मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

शहरातील करबुडव्या दुकानादारांना नोटिस पाठविली आहे, त्यामुळे कर वसुली ही केली जाणार आहे. यापुढे बेकायदा दुकाने चालणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कर चुकविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे शिरोडकर म्हणाले.

12 ऑक्टोबर रोजी शिरोडकर यांनी नगराध्यक्ष पदाचा ताबा घेतला होता. आपण पदाचा ताबा घेतल्यास दीड महीना पूर्ण झाला. या कालावधीत आपण नगरपालिका प्रशासनाला सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. 20 दिवसापूर्वी करांची थकबाकी वसूल करण्याची मोहीम आपण हातात घेतली होती. आतापर्यंत 45 लाख रुपयांची थकबाकी वसूल केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मडगाव पालिकेकडे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असून महिन्याकाठी पालिकेला पगारावर अडीच कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यातील 38 लाख रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा पगार आहे. त्यामुळे पालिकेला आपल्या उत्पन्नात भर घालावी लागेल, असे सांगून ज्या व्यापाऱ्यांनी अजून आपला कर भरलेला नाही, त्यांनी तो भरावा, असे ते म्हणाले.

कर न भरल्यास कारवाई होणार

ज्यांच्याकडे विक्री परवाने नाहीत, त्यांना या आधीच पालिकेने नोटीस बजावली आहे. त्यांनी कर भरला नाही, तर त्यांच्यावर कारवाई होईल. काही दुकानदारांना विक्री परवाने घेण्यास कायदेशीर अडचणी येत आहेत, अशा दुकानदारांना हे परवाने कसे देता येईल, यासाठी आपण कायदेशीर सल्ला घेणार, असे शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT