Goa Farmers Dainik Gomantak
गोवा

पावसामुळे सुपारी उत्पादक शेतकरी चिंतेत

पावसामुळे सत्तरी तालुक्यातील प्रमुख मानले गेलेले सुपारी पीक संकटात सापडले आहे. असाच पाऊस पुढेही पडत राहिल्यास सुपारी उत्पादनाचे ‘गणित’ बिघडणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Farmers: यंदा पावसाने (Rain) कहर केला असून, डिसेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस पडत असल्याने सत्तरी तालुक्यातील (Taluka) प्रमुख मानले गेलेले सुपारी पीक (Betel nut) संकटात सापडले आहे. असाच पाऊस पुढेही पडत राहिल्यास सुपारी उत्पादनाचे ‘गणित’ बिघडणार आहे.

डिसेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने नवी सुपारी सुकविण्यावर परिणाम झाला आहे. प्रसंगी बागायतदारांना (Farmers) नवी सुपारी घरातील ठराविक जागेत किंवा शेडमध्ये ठेवावी लागली आहे. नवीन सुपारी काढणी नंतर ती सुपारी उन्हात वाळवणे गरजेचे असते. पण, पावसामुळे भयावह परिस्थिती बनली आहे.

दरही जाहीर होण्यास विलंब

परिपक्व झालेली सुपारी पावसानंतर कुळागरात रोज झडत असते. पण सध्या पाऊस पडत असल्याने सुपारी सुकलेली नाही. या एकूण परिस्थितीमुळे पावसामुळे नव्या सुपारी पिकाचे गणितच बिघडले आहे. बागायतदारांनी सुपारीची पहिली काढणी कशीबशी केली होती. आता दुसरी काढणी होण्यास पावसाचा अडथळा ठरत आहे. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन उत्सव झाले की, नवा सुपारीचा दर जाहीर केला जातो. पण पावसामुळे नवी सुपारी सुकलेली नसल्याने नवा दरही जाहीर झालेला नाही

..तर काजू पिकांनाही बसणार फटका

चार घास सुखाचे मिळावेत यासाठी काबाडकष्ट करून कष्टकरी बांधव आजही शेती व्यवसाय टिकवून आहेत. पण, सध्या निसर्गाची साथच मिळत नसल्याने बळीराजा हवालदिल बनला आहे. सांगे भागात हातातोंडाशी आलेली भातशेती अवकाळी पावसामुळे आडवी झाल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिथे यंत्राद्वारे भात कापणी करणे शक्य नाही, अशा ठिकाणी मनुष्यबळ वापरून भात कापणीसाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता संकट उभारले आहे.

साधारणतः नोव्हेंबर महिन्यात पाऊस पूर्णपणे माघारी जातो. पण, यंदा डिसेंबर उजाडूनही पावसाचे थैमान सुरू असल्याने शेती पिकाचे नुकसान होत आहे. सांगेतील काही भागात अल्पावधीत कापणीसाठी आलेले पीक काही शेतकऱ्यांनी वेळेत कापणी केले आहे. पण काही जणांचे अजूनही भात पीक तसेच असल्याने आता ते पावसामुळे आडवे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT