डेल्टा प्लस व्हेरियेंटचे विषाणू तपासण्यासाठी व जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी प्रयोग शाळा त्वरित स्थापन करावी गिरीश चोडणकरांची मागणी.  Dainik Gomantak
गोवा

Goa: डेल्टा प्लस चाचणीसाठी प्रयोग शाळा त्वरित स्थापन करावी

अन्यथा कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे. डेल्टा प्लस शेजारच्या कोकणात, कर्नाटक आणि केरळमध्ये आधीच पोहोचला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: डेल्टा प्लस (Delta Plus) व्हेरियेंटचे विषाणू तपासण्यासाठी व जीनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) चाचणीसाठी प्रयोग शाळा (laboratory) त्वरित स्थापन करावी. नाहीतर कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Congress President Girish Chodankar) यांनी आज जारी केलेल्या पत्रकातून दिला आहे.

इतर राज्यातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या लोकांची फक्त ॲन्टीजन चाचणी करुन भाजप सरकार राज्यातील लोकांचे आयुष्य धोक्यात आणत आहे. डेल्टा प्लस शेजारच्या कोकणात, कर्नाटक आणि केरळमध्ये आधीच पोहोचला आहे.

हा विषाणू फक्त जीनोम सिक्वेन्सिंग द्वारे ओळखायला मिळतो. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील बेजबाबदार भाजपा सरकारने गोव्यात जीनोम चाचणी सुविधा सुरू करण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत. अशी मागणी करून कोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे भाजपा सरकारने कोविड रुग्णांची हत्या केली . असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकार कमिशनचा वाटा ठरविण्यात व्यस्त राहिले, ज्यामुळे ३ हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT