Pernem Excise Department Dainik Gomantak
गोवा

Goa Excise Scam : ‘अबकारी’ची ‘एसीबी’मार्फत चौकशी; पेडण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयातील आर्थिक घोटाळा प्रकरण

दैनिक गोमन्तक

The Anti Corruption Bureau Goa : अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयातील आर्थिक घोटाळा प्रकरण दक्षता खात्याकडे दिले आहे. या प्रकरणाची चौकशी भ्रष्टाचारविरोधी पथकामार्फत (एसीबी) करण्याचेही निर्देश सरकारने अबकारी खात्याला दिले आहेत.

त्यामुळे पेडण्यातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करू, कोणाचीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.

पेडणे कार्यालयात परवाने नूतनीकरणासाठी सुमारे ७६ मद्य व्यावसायिकांनी शुल्क जमा करूनही ते कार्यालयाच्या तिजोरीत जमा केले नव्हते.

जेव्हा या व्यावयायिकांना शुल्क जमा न केल्याप्रकरणी नोटिसा पाठवल्या, तेव्हा हे घोटाळा उघडकीस आला. या कार्यालयातील वरिष्ठ कारकून हरिष नाईक याने घोटाळा केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले.

त्याने केलेल्या भ्रष्टाचाराची रक्कम तसेच त्यावरील पाच वर्षांचे व्याज मिळून सुमारे २८ लाख रुपये त्याच्याकडून वसूल केले आहेत. या घोटाळ्याच्या काळात पेडणे कार्यालयातील निरीक्षक दुर्गेश नाईक आणि विभूती शेट्ये या दोघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला होता. या तिघाही जणांना सेवेतून निलंबित केले आहे.

अबकारी खात्याचा भार असलेले मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, या प्रकरणाची चौकशी दक्षता खात्यामार्फत केली जाईल. आवश्‍यकता भासल्यास हे प्रकरण एसीबीकडे देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार अबकारी खात्याने प्रकरण चौकशीसाठी दक्षता खात्याकडे दिले आहे. सखोल चौकशीसाठी ते एसीबीकडे देण्यात आले आहे.

लेखा परीक्षण सुरू

पेडणे कार्यालयातील घोटाळा उघडकीस आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले असून अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी तातडीने सर्व कार्यालयांमध्ये लेखा परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व तालुक्यांतील अबकारी खात्याच्या कार्यालयांतील लेखा परीक्षण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा अहवाल या महिनाअखेरीस पाठवण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT