Liquor Seized in Goa
Liquor Seized in Goa  Dainik Gomantak
गोवा

Liquor Seized in Goa : पत्रादेवी तपासणी नाक्यावर 28 लाखांची दारु जप्त 

गोमन्तक डिजिटल टीम

Liquor Seized in Goa : पत्रादेवी तपासणी नाक्यावर आज सकाळी अवैधरित्या गोव्याबाहेर नेला जाणारा मोठा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. आज गुरुवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास DD 01 H 9228 या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकमधून बेकायदेशीररित्या दिल्लीला तस्करी केली जाणारी दारु पकडण्यात यश आलं आहे. ट्रकसह  पकडलेल्या दारुची किंमत 28 लाख 53 हजार असल्याची माहिती आहे.

दिल्लीला चोरुन नेण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारुच्या 635 बॉक्ससह गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी चालक दीपक राजकुमार याला अकबारी खात्याने ताब्यात घेऊन मोपा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पेडणे अबकारी सहाय्यक निरीक्षक जयेश बांदेकर यांनी याप्रकरणी माध्यमांना माहिती दिली आहे. ते म्हणाले, दारुची अवैध वाहतूक करणारी गाडी पहाटे 3.30 वाजता पत्रादेवी येथे पोहोचली. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही गाडी तपासणीसाठी थांबवली. मात्र या गाडीत मोठ्या आकाराचे पुठ्ठे लावण्यात आले होते. त्यामुळे संशय आल्याने अधिकाऱ्यांनी गाडीची कसून तपासणी केली. ज्यात अधिकाऱ्यांना पुठ्ठ्याच्या पुढे दारुचे खोके दिसले. ट्रकमधून हे खोके  काढण्यासाठी पाच कर्मचाऱ्यांना दोन तासांहून अधिकचा वेळ लागला.

तपासणीत गाडीमधील रॉयल ब्लू नावाची बनावट व्हिस्कीचे 635 बॉक्स अधिकाऱ्यांना सापडले. या दारुची बाजारातील किंमत 8 ते 10 लाख रुपये आहे. ही दारु बनावट असून बॉक्स किंवा बाटलीवरील लेबलवर कुठलाही पत्ता नाही. 

याप्रकरणी अधिकाऱ्यांनी संबंधित गाडीचालक आणि मालकास ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. गाडीतील माल पेडणे कार्यालयात आणि गाडी दोडामार्ग येथे ठेवण्यात आली आहे.  चालक आणि मालक यांना मोपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

Tiswadi Agriculture : नेवरा खाजन शेतजमिनीत पुन्हा नदीचे खारे पाणी; शेतीला चालना देण्याचे पोकळ दावे

SCROLL FOR NEXT