Goa Excessive rain Dainik Gomantak
गोवा

Drishti Marine: बीचवर जाताय? जीवरक्षक दृष्टी मरीनने दिला 'हा' इशारा

जीवरक्षक एजन्सी दृष्टी मरीन यांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे

Kavya Powar

Goa Excessive rain; drishti marine advice not to venture into the rough seas

गोव्यात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे आज (रविवार) भारतीय हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता समुद्रकिनारी जाणाऱ्यांना जीवरक्षक एजन्सी दृष्टी मरीन यांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) ने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे समुद्र खवळलेल्या अवस्थेत आहे. यातच पाण्याची पातळी वाढत असून पाण्याचा प्रवाह तीव्र होत आहे. तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे दक्षिण कोकण-गोवा समुद्रकिनारी राहणाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दृष्टी मरीनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांनी उच्च पाण्याची पातळी आणि गोव्याच्या किनारपट्टीवर किंवा समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात मुसळधार पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण जनजीवनही विस्कळीत झाले आहे. गावांना जोडणारे पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ही एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) ने दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांचे नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहेत. पुढील २४ तासांत गोव्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT