Lavoo mamledar death case Dainik Gomantak
गोवा

Fact Check: गोव्याच्या माजी आमदारांना मारहाण करताना 'अल्ला हू अकबर'च्या घोषणा दिल्या का?

Lavoo Mamledar Death Case: गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा शनिवारी (१५ फेब्रुवारी) बेळगावात मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी त्यांना रिक्षा चालकाकडून मारहाण झाली होती.

Pramod Yadav

पणजी : गोव्याचे आमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यूप्रकरणी अटक झालेल्या रिक्षाचालकाने मामलेदारांना मारहाण करण्यापूर्वी 'अल्ला हू अकबर' घोषणा देत चार ते पाच जण गोळा केले आणि माजी आमदारांना मारहाण केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, या दाव्यात तथ्य आहे का, 'दैनिक गोमन्तक'च्या फॅक्ट चेकमध्ये काय समोर आले?

सोशल मीडियावरील दावा काय?

फेसबुकवर एका युजरने पोस्ट शेअर केली आहे. यात असे म्हटले आहे की, "गोव्यातील आमदार लवू मामलेदार काही कामानिमित्त बेळगावला आले असावेत आणि स्वतः गाडी चालवत असताना एका रिक्षाला चुकून धक्का लागला. त्यासाठी त्यांनी क्षमाही मागितली. पण तो रिक्षावाला अल्लाहू अकबर म्हणत आणखीन चार-पाच रिक्षावाल्यांना गोळा केलं आणि त्यांच्या गाडीचा पाठलाग केला.. ते जिथे हॉटेलमध्ये राहत होते तिथे गाडीतून उतरल्याबरोबर ..या सगळ्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आणि त्यांना अतिशय त्वेषाने ठोसे मारले त्या धक्क्यातच ते हॉटेलचा जिना चढले आणि रिसेप्शन काउंटर समोर खाली कोसळले व गतप्राण झाले. रिक्षाला चुकून धक्का लागला.. त्यांनी माफीही मागितली... पण अल्लाहू अकबरवाले किती क्रूर झाले.. किती क्रूर आहेत... हे त्यांनी स्वतःच्या प्रतिक्रियेतून सिद्ध केलंच आहे. ते तसेच आहेत. त्यांच्यात बदल होणार नाही. पण, आज आमच्या पोलिस अधिकारी तुकडीचा एक अतिशय संवेदनशील आणि मनमिळावू पोलीस अधिकारी आणि गोव्याचे माजी आमदार हकनाक प्राणास मुकले हे आमच्यासाठी फार क्लेशदायक आहे."

फॅक्ट चेकमध्ये काय उघडकीस आले?

'दैनिक गोमन्तक' डिजिटल टीमने बेळगावमधील सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी, पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि सीसीटीव्ही तपासले. पोलिसांनी माध्यमांना पाठवलेल्या प्रेसनोटमध्ये किंवा एफआयआरमध्ये अल्ला हू अकबरच्या घोषणाबाजी केल्याचा उल्लेख नाही. तसेच सीसीटीव्हीमध्येही जमाव दिसत नाही. CCTV फुटेजनुसार एक रिक्षा चालक लवू मामलेदार यांच्याशी हुज्जत घालताना दिसत आहे. रिक्षा चालकाने मामलेदार यांना हाताने मारहाण केल्याचे देखील व्हिडिओत दिसले. यावेळी एक व्यक्ती रिक्षा चालकाला रोखण्याचा प्रयत्न करतोय. भांडणाचा आवाज ऐकूण आजुबाजूचे काही लोक घटनास्थळी दाखल होतात आणि मध्यस्थी करतात. यानंतर मामलेदार लॉजच्या पायऱ्या चढून आत जाताना दिसत आहेत. लॉजच्या रिसेप्शनजवळ येताच मामलेदार खाली कोसळल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

मामलेदार यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ खाली पाहता येईल...

लॉजच्या कर्मचाऱ्यांनी काय सांगितले?

बेळगावमधील शिवानंद लॉज परिसरात ही घटना घडली. या लॉजचे कर्मचारी अडिवेप्पा करलिंगन्नावर यांनी याबाबत घटनाक्रम सांगितला आहे. मामलेदार या लॉजमध्ये नेहमीच वास्तव्यास येत असतं.

लॉजच्या पार्किंगमध्ये त्यांनी कार पार्क केल्यानंतर रिक्षा चालक त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. रिक्षा चालकाने त्यांच्यावर हल्ला केला पण, आम्ही त्यांना सोडवून लॉजच्या दिशेने पाठवले. रुमकडे जाताना रिसेप्शनजवळ मामलेदार कोसळून पडले. रुग्णालयात घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदन अहवाल

लवू मामलेदार यांच्या शवविच्छेदन अहवालातून त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्टच असल्याचे समोर आले आहे. मामलेदार यांचा राखून ठेवलेला व्हिसेरा तपासणीसाठी बंगळुरु येथे पाठविण्यात आला होता. या अहवालानुसार मामलेदार यांच्या शरीराच्या मागच्या बाजूस काळा डाग आढळून आला आहे. याशिवाय कोणतीही मोठी जखम त्यांच्या शरीरावर आढळून आली नाही, असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, रासायनिक विश्लेषण आणि हिस्टोपॅथोलॉजी अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Lavoo Mamledar Post Mortem Report

पोलिसांच म्हणणं काय आहे?

‘‘अपघातावरून शाब्दीक चकमक उडाली. यातून संशयित तरुणाने गोव्याचे माजी आमदार मामलेदार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर थोड्या वेळात मामलेदार यांच्या मृत्यूची नोंद आहे. यामुळे तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. अटक करून कारागृहात रवानगी केली आहे,’’ अशी माहिती बेळगाव मार्केट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT