Lavoo Mamledar Dainik Gomantak
गोवा

Lavoo Mamledar Death Case: सनदीचा मुक्काम तुरुंगातच! लवू मामलेदार मृत्यू प्रकरणी कोर्टाचा दिलासा नाहीच

Goa Ex-MLA Lavoo Mamledar Death Case: संशयित रिक्षा चालक आमीरसोहेल शकिलसाब सनदी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली होती.

Pramod Yadav

बेळगाव: फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या आमीरसोहेल शकिलसाब सनदी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. बेळगाव प्रथमवर्ग न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. यामुळे पुढील सुनावणीपर्यंत सनदीचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. गेल्या महिन्यात लवू मामलेदार यांचा बेळगावात मृत्यू झाला होता.

माजी आमदार लवू मामलेदार कामानिमित्त बेळगावात गेले असता त्यांच्या कारचा धक्का संशयित सनदीच्या रिक्षाला लागला यावरुन दोघांमध्ये वाद झाला. रिक्षा चालकाने मामलेदार यांना मारहाण देखील केली. दरम्यान, हॉटेलमध्ये जात असताना मामलेदार यांचा कोसळून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित रिक्षा चालक आमीरसोहेल शकिलसाब सनदी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली होती.

फेब्रुवारीच्या १५ तारखेला बेळगावातील खडेबाजार परिसरात ही घटना घडली होती. याप्रकरणाची गोवा सरकारने देखील गंभीर दखल घेत सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील याप्रकरणी भाष्य केले होते. लवू मामलेदार यांनी रिक्षाला धक्का लागला म्हणून माफी मागून हॉटेलमध्ये जात होते. दरम्यान, रिक्षा चालकाने प्रकरण वाढवत त्यांचा पाठलाग केला व मारहाण देखील केली.

हॉटेलच्या मॅनेजर आणि काही स्थानिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मामलेदार हॉटेलच्या दिशेने जात असताना रिसेप्शनजवळ आल्यानंतर खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत खुनाचा गुन्हा नोंद केला व संशयित रिक्षा चालक आमीरसोहेल शकिलसाब सनदी याला अटक केली.

दरम्यान, संशयित आरोपीने जामिनासाठी केलेला अर्ज बेळगाव प्रथमवर्ग न्यायालयाने फेटाळला आहे. सनदीच्या अर्जावरीला सुनावणी आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच होईल, अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT