Goa Mega Job Dainik Gomantak
गोवा

Goa Mega Job Fair: रोजगार मेळाव्याला उत्सफूर्त प्रतिसाद; युवक-युवतींनी लावल्या लांब रांगा

श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर युवक-युवतींनी लावली हजेरी

दैनिक गोमन्तक

गोवा सरकारने युवक-युवतींसाठी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामूळे तालेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आज सकाळपासून आहे.

(goa Enthusiastic youth large response to Mega Job Fair )

मिळालेल्या माहितीनुसार तालेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर आजपासून रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली आहे. यास युवक-युवतींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामूळे इनडोअर स्टेडिअमवर नोकरीसाठी युवक-युवतींच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरु असून युवक युवतींनी आपला अर्ज भरल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक बारकोड पाठवला गेला आहे. या बारकोडला स्कॅन केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु केली जात आहे.

बारकोडवर ज्या प्रमाणे माहिती मिळेल त्याप्रमाणे पात्र विभागाकडे युवक - युवतींना पाठवले जाते आहे. इनडोअर स्टेडिअमवर सुरुवातीलाच बारकोड स्कॅन करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. या मेळाव्याला सुमारे तब्बल 18 हजार युवक - युवती हजेरी लावतील असा ही अंदाज असल्याचं कामगार आयुक्तांनी म्हटले आहे. मात्र आज उपस्थित असणाऱ्यांची संख्या माहीत होऊ शकलेली नाही.

युवकांना मिळते आहे मोबाईलवर अपडेट

गोवा सरकारने आयोजित केलेला रोजगार मेळावा तालेगाव सुरु झाला असून नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम महत्वाचा आहे, कारण या मेळाव्यात 153 कंपन्या युवकांना संधी देणार आहेत याचा फायदा युवकांना होणार आहे. तसेच सर्व अपडेट मोबाईलवर समजत असल्याने युवकांचा त्रास काहीसा कमी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT