Elvis Gomes | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Elvis Gomes: नोकरभरती ही कर्मचारी निवड आयोगामार्फत होण्याची गरज

Elvis Gomes: ‘व्होट बँक’साठी भाजपाचा खटाटोप

दैनिक गोमन्तक

Elvis Gomes: एकीकडे भाजपा सरकार नोकऱ्‍यांमध्ये पारदर्शकता राखणार असे सांगते, परंतु या सरकारने रोजगार मेळावा हा आपल्या कार्यक्रमाप्रमाणे राबवत युवकांना नियुक्तीपत्रे दिली ही मोठी शोकांतिका.

मुळात ही भरती प्रक्रिया खऱ्या अर्थाने कर्मचारी निवड आयोगामार्फत होण्याची गरज होती. राज्यातील नोकरभरती ही फक्त गुणवत्तेवरच झाली पाहिजेत, असे मत काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी व्यक्त केले. शुक्रवारी म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एल्विस गोम्स म्हणाले की, मुळात सरकार नोकरभरतीसाठी पैसे देण्याची गरज नाही असे सांगत लोकांना पैसेच द्यावे लागतील हा छुपा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न करते. सरकारच्या भूमिकेत पारदर्शकता नाही.

सरकारने गुरुवारी रोजगार मेळाव्यातून ज्या युवकांना नियुक्तीपत्रे दिली, तो सरकारचा कार्यक्रम होता. मात्र, तिथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हजर होते. या युवकांना सरकार पगार देणार मात्र या नोकऱ्या भाजपाने दिल्या आहेत असे कालच्या कार्यक्रमातून भासविण्यात आले.

हा खटाटोप फक्त ‘व्होट बँक’साठी भाजपकडून चालविल्याचा आरोप गोम्स यांनी केला. भविष्यात हे सरकारी सेवेत रुजू होणारे युवक भाजपाचे कामगार असतील की सरकारचे? याबाबत शाशंकता निर्माण होते. मुळात नोकरभरती असो किंवा प्रत्येक सरकारी कामकाजात पारदर्शकता हवी असल्याचे गोम्स म्हणाले.

विजय भिके म्हणाले की, मुख्यमंत्री घाबरण्याची गरज नाही व नोकरभरतीत पैसे देण्याची गरज नाही असे म्हणतात. मात्र, नोकरीसाठी पैसेच द्यावे लागतील असेच सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करताहेत अशी टीका त्यांनी केली.

भाजपा सरकारने जॉब फेअरमधून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला असा दावा केला आहे, परंतु सत्य वेगळेच असून याविषयी आम्ही आरटीआय मागविली आहे. यातून सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर काँग्रेस आणणार असेही भिके म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, अतुल नाईक, जॉन नाझारेथ हे उपस्थित होते.

‘...तर गोवा पहिले राज्य बनेल’

जेव्हा माणसाचा समावेश असतो, तेव्हा भ्रष्टाचार होतो. जर मुख्यमंत्र्यांनी विविध सरकारी खात्यातील कर्मचारी निवड संगणकीकृत चाचण्यांद्वारे घेऊन त्याचा निकालही त्वरित जाहीर केल्यास गोवा हे देशातील अशी पारदर्शक कर्मचारी निवड प्रक्रिया करणारे पहिले राज्य होईल.

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दूरदर्शी नेते म्हणून ओळखले जातील. त्यांनी हे यशस्वीपणे केले, तर त्यांचे नाव ऐतिहासिक होईल. पैशाने नोकऱ्या विकत घेतात हे जे आरोप सुरू आहेत ते कायमचे बंद होईल, असे मत डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT