Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: करारापेक्षा जास्त वीज वापराल तर होणार दंड! वीज खात्‍याकडून नोटीस जारी

Goa electricity penalty notice: संयुक्त वीज नियामक आयोगाने (जेईआरसी) काही महिन्‍यांपूर्वी २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी सुधारीत दरपत्रक अधिसूचित केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : वीज खात्‍याने मंजूर केलेल्‍या किंवा खात्‍याशी करार करून घेतलेल्‍या भारापेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त मागणी आणि वापर या दोन्‍हींसाठी यापुढे दंड भरावा लागणार आहे. वीज खात्‍याने याबाबतची नोटीस नुकतीच जारी केली.

संयुक्त वीज नियामक आयोगाने (जेईआरसी) काही महिन्‍यांपूर्वी २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी सुधारीत दरपत्रक अधिसूचित केले आहे. या दरपत्रकाची १ ऑक्टोबर २०२५ पासून अंमलबजावणीही करण्‍यात आली आहे.

‘जेईआरसी’ने यावेळी बहुतांशी ग्राहकांसाठीच्‍या बिलिंग पद्धतीत बदल केला असून, ग्राहक श्रेणींसाठी सुधारित दर लागू केले आहेत.

सोबतच जे ग्राहक त्यांच्या करार केलेल्या भारापेक्षा जास्त विजेचा वापर करतील, त्यांना विजेची अतिरिक्त मागणी आणि वापर या दोन्हींसाठी प्रमाणानुसार दंड आकारण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. असा दंड टाळण्यासाठी ग्राहकांनी गरजेनुसारच वीज वापरावी, असा सल्लाही खात्‍याने दिला आहे.

दरम्‍यान, वीज ग्राहकांना बिलिंग पद्धती आणि इतर संबंधित शुल्कांबद्दलची माहिती वीज खात्‍याच्‍या www.goaelectricity.gov.in या वेबसाईटद्वारे देण्‍यात आल्‍याचेही खात्‍याने नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sealed Club: सील केलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याने संशय, प्रशासकीय सावळागोंधळ की मिलीभगत? 'अग्निसुरक्षे'चे नियम धाब्यावर

Goa Live News: लोकशाहीत प्रत्येक लोकप्रतिनिधीला समान अधिकार: दामू नाईक

वर्षाचा शेवटचा दिवस आयुष्याचाही शेवटचा ठरला; गोव्याच्या समुद्रात बिहारचा एक पर्यटक बुडाला, दुसरा जखमी

Horoscope: नव्या वर्षाची दमदार सुरुवात! 1 जानेवारीला 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; पैसा, नोकरी, करिअरमध्ये जबरदस्त यश

Goa Municipal Election: पालिका निवडणुकांसाठी प्रभाग राखीवता तातडीने जाहीर करा, अन्‍यथा न्यायालयात जाणार; विजय सरदेसाईंचा इशारा

SCROLL FOR NEXT