Vijai Sardesai and Damu Naik Dainik Gomantak
गोवा

फातोर्डा मतदारसंघात जनतेचा काैल कोणाला?

फातोर्डामध्ये विकास कामांचा अभाव आहे काही प्रमाणात विकास झाला आहे, मात्र..

दैनिक गोमन्तक

गोवा : राज्यात आज विधानसभा निवडणुका पार पडल्या. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली, राज्यात सगळीकडे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांची करडी नजर चुकवून अनेक ठिकाणी मद्य आणि पैशांचा काळाबाजार काही प्रमाणात घडताना दिसून आला. अशा घटणणविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उचलला आहे.

दरम्यान, फातोर्डा (Fatorda) मतदारसंघातील भाजपा उमेदवार दामू नाईक (Damu Naik) म्हणतात की मी गेल्या दहा वर्षात केलेली मतदार संघातील कामे आणि जनतेला त्याचा झालेला फायदा पाहता यावेळी देखील मीच निवडणून येईल. आपल्या विरोधात कितीही कटकारस्थान झाले किंवा विरोधी उमेदवारांनी अपप्रचार केला म्हणून काही होणार नाही, जनता आपल्यासोबत आहे. आणि मीही जनतेसोबत आहे. फातोर्डामध्ये विकास कामांचा अभाव आहे काही प्रमाणात विकास झाला आहे, मात्र तो कुचकामी विकास आहे. याला भाजप (BJP) जबाबदार नसून त्याठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते जबाबदार आहेत अस मत यावेळी त्यांनी मांडले.

दरम्यान, फातोर्डा मतदारसंघातील गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) उमेदवार विजय सरदेसाई यांनी देखील यावेळी गोमन्तकशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर निशाना साधला. भाजप ही भ्रष्ट पक्ष आहे. तसेच त्यांचे आमदार हे बलात्कार आणि गुन्हेगारीशी संबंधित आहेत. त्यामुळे जनता त्यांना नाकारेल आणि कॉंग्रेस, गोवा फोरवर्डच्या युतीला यावेळी सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या उमेदवारांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. मात्र टीएमसी आणि आपमुळे काही प्रमाणात मतदान फुटले आहे. टीएमसी ही भाजपची बी-टीम आहे हे आमच्या हुशार जनतेला कळले आहे. त्यामुळे जनतेचा पाठिंबा हा कॉंग्रेस, गोवा फोरवर्ड युतीला आहे. अस मत विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी व्यक्त केले. मात्र याचा सगळा लेखा जोका हा 10 मार्च ला म्हणजे मतमोजणी दिवशी समोर येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT