Revolutionary Govans Office in Mandre constituency Dainik Gomantak
गोवा

निडणुकीपुर्वी रेव्होलूशनरी गोवन्सच्या मांद्रे गटाची जोरदार तयारी

सद्या गोव्यात (Goa) निडणुकांपूर्वीचे वारे वाहू लागले आहे. बहुतेक पक्षांची तयारी जोरदार चालू आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: सद्या गोव्यात (Goa) निडणुकांपूर्वीचे वारे वाहू लागले आहे. बहुतेक पक्षांची तयारी जोरदार चालू आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रेव्होलूशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) मांद्रे गटाने मधलामज, मांद्रे येथे आपले ऑफिस सुरू केले असून, या मुहूर्तावर मतदारसंघातील (Mandrem Constituency) काम अधिक जोराने करण्याचे त्यांनी ठरवले आहे. "मांद्रे मतदारसंघात जागेचा प्रश्न आणि त्या जमिनी स्थानिकांकडून विकत घेवून नंतर चाललेली दिल्लीतल्या बिल्डर लॉबी ची दादागिरी, यामुळे स्थानिक लोक कंटाळले आहेत. आम्ही स्थानिकांच्या बरोबर कायम राहू आणि त्यांचे हक्क त्यांना मिळवून देवू", असे आरजीच्या मनोज परब यांनी म्हटले. यावेळी मांद्रे आरजीच्या नेत्या सुनयना गावडे व इतर सदस्य उपस्थित होते. स्थानिकांसाठी त्यांचे दार कायम उघडे असणार असेही त्यांनी सांगितले.

"येथील स्थानिक आमदाराला एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याची सवय झाली आहे आणि लोक या सवयीला कंटाळले आहेत. मुळ गोवेकरांवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध लढण्यास रेव्होलूशनरी गोवन्स कायम तयार आहे. पोगो बिल हेच गोव्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेव उपाय आहे. भाजप सरकार हे अतिशय उन्मत्त आणि हेकेकोर झाले आहे. परप्रांतीय मतदारांना खुश ठेवण्यासाठी हे सरकार गोव्याच्या लोकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत गोवेकरच यांना घरी बसवतील असा मला ठाम विश्वास आहे. पोगो बिलाची जागृती आम्ही घराघरात जावून करू आणि मांद्रेची जागा आरजीचीच असेल.", सुनयना गावडे यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT