Dry Day  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: गोव्यात मतदान आणि मतमोजणी दिवशी 'ड्राय डे'!

पुढील काही दिवसात गोव्यासह (Goa) पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणूक 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने 12 फेब्रुवारी संध्याकाळी 6 पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. त्याचबरोबर पाचही राज्याची मतमोजणी 10 मार्च रोजी करण्यात येणार असून या दिवशी देखील गोवा राज्यातील सर्व मद्यविक्री दुकानांना कुलूप असेल, अशी माहिती समोर येत आहे. (Goa Assembly Election 2022)

पुढील काही दिवसात गोव्यासह (Goa) पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पाचही राज्यात एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्चच्या सायंकाळी 6:30 पर्यंत आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) रविवारी रोड शो, पद यात्रा, सायकल आणि वाहन रॅलींवरील बंदीचा कालावधी वाढवला असला तरी खुल्या मैदानात आणि बंद जागेत होणाऱ्या निवडणूक प्रचार सभांवर लादलेले नियम काही प्रमाणात शिथील केले आहेत.

व्हॅलेंटाईन डे दिवशी मतदान
सध्या जगभरातील तरुणांमध्ये व्हॅलेंटाईन डेचा (Valentine's day) उत्साह पाहायला मिळत आहे. साधारणपणे हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो, मात्र यावेळी गोव्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना निराशेचा सामना करावा लागू शकतो. गोव्यात 2022 च्या विधानसभा निवडणुकांमुळे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारीला मतदान (Voting) होणार आहे. गोव्यासह पाच राज्यांतील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT