भारतीय जनता पक्षाने (BJP) अखेर उमेदवारी (Candidacy) दिल्लीत (Delhi) ठरवली जाईल, असे सांगून बंडाळीवर तात्पुरता तोडगा काढला आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: उमेदवारी दिल्लीतूनच असे सांगत, बंडाळींवर भाजपचा तात्पुरता तोडगा

भाजपच्या (BJP) इच्छुक उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या नव्या घडामोडींविषयी प्रचंड नाराजी आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पक्षाने (BJP) अखेर उमेदवारी (Candidacy) दिल्लीत (Delhi) ठरवली जाईल, असे सांगून बंडाळीवर तात्पुरता तोडगा (solution) काढण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अनंत चतुर्दशीनंतर गोव्यात (Goa) येणार असून त्यांच्यासमोर हा विषय सविस्तरपणे मांडण्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे.

मंत्री मायकल लोबो, मंत्री विश्‍वजीत राणे आणि उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. याआधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून दोन आणि काँग्रेसमधून दहा आमदार भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे ते बारा मतदारसंघ आणखी हे तीन मतदारसंघ मिळून 15 मतदारसंघांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी उमेदवारी मिळणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या नव्या घडामोडींविषयी प्रचंड नाराजी आहे. इतकी वर्षे पक्षाचे काम करून उमेदवारी मिळणार नसेल आणि कोणी तरी बाहेरून येऊन उमेदवारी घेणार असेल तर आम्ही काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. भाजपच्या पक्ष शक्तीनुसार बैठकीच्या बाहेर अशी नाराजी व्यक्त करण्यात येत नसली तरी केंद्रीय नेतृत्वाकडे संधी मिळाल्यास हा विषय मांडण्याचे काही जणांनी ठरवल्याची माहिती मिळाली आहेत.

या कटकटीमुळे निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारीबाबत सर्व निर्णय दिल्लीच्या पातळीवरच घेण्याचे ठरविण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी अनेकजण पराभूत होणार असा दिल्लीतील नेत्यांचा अहवाल असला तरी स्व. मनोहर पर्रीकर त्यांच्या उमेदवारीबाबत आग्रही राहिले होते. आता तसा नेता स्थानिक पातळीवर राहिला नसल्याने उमेदवारीचा निर्णय दिल्लीत होईल आणि त्यात फडणवीस महत्त्वाची भूमिका बजावतील अशी माहिती मिळाली आहे.

येथे बंडाळी होण्याची शक्यता

काणकोण, कुंकळ्ळी, केपे, नुवे, वेळ्ळी, पणजी, ताळगाव, सांताक्रूझ, सांत आंद्रे, थिवी, पेडणे व सावर्डे या मतदारसंघांत बाहेरून आमदार आल्याने भाजप कार्यकर्त्यांची उमेदवारीची संधी गेली आहे.

त्याशिवाय डिलायला लोबो शिवोलीतून, दिव्या राणे वाळपईतून आणि सावित्री कवळेकर सांगेतून उमेदवार ठरल्यास 15 मतदारसंघ भाजपच्या मूळ नेत्या कार्यकर्त्यांसाठी उमेदवारीचा दावा करण्यासाठी उपलब्ध असणार नाहीत.

याशिवाय कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप उमेदवारीवर निवडून आलेले सुभाष शिरोडकर (शिरोडा) आणि दयानंद सोपटे (मांद्रे) हे जमेस धरले तर अशा मतदारसंघांची संख्या 17 वर पोचते.

मंडळ व प्रदेश पातळीवर केवळ उमेदवारीबाबत शिफारस करता येते. पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेते. साहजिकच निवडून येण्याची क्षमता हा महत्त्वाचा निकष असतोच.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

Goa Live Updates: पॅथॉलॉजिकल लॅबला आके-बायश येथे विरोध

SCROLL FOR NEXT