Goa EDC Limited Dainik Gomantak
गोवा

Goa EDC Limited: रोजगारनिर्मिती आणि उद्योगवाढीवर ईडीसीचा भर; मुख्यमंत्री सावंतांकडून कामकाजाचा आढावा

Goa Self Employment Scheme: ईडीसी लिमिटेडच्या ४१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत महामंडळाच्या विविध व्यावसायिक कामकाजाचा तसेच पाटो प्लाझा येथील भूखंडांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ईडीसी लिमिटेडच्या ४१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत महामंडळाच्या विविध व्यावसायिक कामकाजाचा तसेच पाटो प्लाझा येथील भूखंडांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

या बैठकीत महामंडळाच्या सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच विविध योजनांच्या अंमलबजावणीतील प्रगती आणि आर्थिक विकासाशी संबंधित उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीत मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजनेचाही विशेष आढावा घेण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात प्रशिक्षण भागीदार असलेल्या ईडीआयआय गोवा केंद्रातर्फे सादरीकरण करण्यात आले.

या सादरीकरणाच्या माध्यमातून योजनेचे कामकाज आणि प्रशिक्षणाशी संबंधित बाबी संचालक मंडळासमोर मांडण्यात आल्या. राज्यातील युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे आणि उद्योजकतेला चालना देणे या दृष्टीने योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. याशिवाय गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आर्थिक कामगिरीची माहितीही संचालक मंडळाने घेतली. कंपनीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत विविध कामकाजासंबंधी चर्चा करण्यात आली.

प्रभावी अंमलबजावणीवर भर

महामंडळाच्या नियमित कामकाजाचा आढावा, पाटो प्लाझातील भूखंडांची स्थिती, स्वयंरोजगार योजनेची प्रगती आणि गोवा इलेक्ट्रॉनिक्सची आर्थिक कामगिरी या विषयांवर बैठकीत चर्चा केंद्रित होती. राज्यातील उद्योजकता आणि आर्थिक विकासाला पूरक ठरणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch By Romeo Lane Fire: मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाखांची मदत; 'बर्च बाय...' क्लबने कोर्टात जमा केला पहिला हप्ता

FDA Raid: गोव्यात 6 हजार किलो चिकन नष्ट; नागरिकांच्या ताटात जाण्याआधीच एफडीएची कारवाई

EPFO: पीएफधारकांसाठी मोठी बातमी! निवृत्तीनंतरही पीएफ खात्यावर मिळणार व्याज; ईपीएफओ आणणार नवा ‘सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन’?

Goa Business Rules: दुकाने 24 तास सुरू ठेवण्याची मुभा; बार, स्पा आणि डान्स बारनाही परवानगी मिळणार का?

Kadamba Transport: कदंबच्या बसेस आधुनिक झाल्या; ग्रामीण भागातील बससेवा, प्रवाशांची गर्दी अन् कर्मचाऱ्यांच्या सुविधांचे काय?

SCROLL FOR NEXT