Goa Due to good response from citizens there is no need for lockdown at present
Goa Due to good response from citizens there is no need for lockdown at present 
गोवा

गोवा: नागरिकांच्या उत्तम प्रतिसादामुळे, सध्या लॉकडाऊनची गरज नाही

गोमंतक वृत्तसेवा

पणजी : राज्यात लसीकरणाची मोहीम सुरू असून त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आताच्या घडीला लॉकडाऊनची गरज नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे ती कायम ठेवण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून केल्या. लॉकडाऊन केल्यास अर्थव्यवस्था कोलमडून लोकांवर उपासमारीची पाळी येईल असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना व्यक्त केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून राज्यातील कोरोना संक्रमणाची स्थिती काय आहे याबाबत माहिती जाणून घेतली. गोव्यासारख्या लहान राज्याला लॉकडाऊनची गरज नसून लसीकरणाची मोहीम राबवून कोरोना संक्रमणावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करा अशा सूचना त्यांनी केल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. (Goa Due to good response from citizens there is no need for lockdown at present)

सध्या अर्थव्यवस्था रूळावर येत आहे अशा परिस्थितील या वाढत्या कोरोना संक्रमणामुळे राज्यात लॉकडाऊन केल्यास त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याबरोबरच व्यवसाय बंद होऊन उपासमारीला लोकांना सामोरे जावे लागेल. लॉकडाऊन करू नका, नाईट कर्फ्यू लावायचा नाही. लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी त्यासाठी गोवा सरकारने सर्व त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. गोवा सरकारनेही हीच भूमिका घेतली आहे, असे सावंत म्हणाले. 

राज्यात जरी मोठ्या प्रमाणात पर्यटक आले तरी लोकांना त्यांच्याबरोबर मिळण्याची काही आवश्‍यकता नाही. हॉटेल उद्योग तसेच इतर उद्योगांनी जर योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना संक्रमणाचे प्रमाण नियंत्रणात आणणे शक्य होईल. काही उद्योगांनी ४५ वर्षाखालील कर्मचाऱ्यांना लसीकरण द्यावे अशी मागणी केली आहे त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारला त्याला परवानगी देण्याची विनंती केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT