Train Accident Dainik Gomantak
गोवा

Train Accident: धावत्या ट्रेनमधून पडून युवकाचा मृत्यू; दूधसागर येथील धक्कादायक घटना

Train Accident: सदर तरुण चालत्या रेल्वेच्या जनरल कोचच्या प्रवेशद्वारावर उभा होता

Ganeshprasad Gogate

Train Accident: दूधसागर येथे धावत्या ट्रेनमधून पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर येतेय. नीलकंठ चव्हाण (वय 24)असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

सदर तरुण चालत्या रेल्वेच्या जनरल कोचच्या प्रवेशद्वारावर उभा असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. हा तरुण मूळचा कुठला किंवा त्याच्या पश्चात कुणी आहे याबाबत सावितर माहिती उपलब्ध झाली नाही.

नववर्षाचा पहिला दिवस आणि सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस हा अपघात, गुन्हेगारीच्या घटनांनी बराच गाजला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हजे आज सोमवारी राजधानी पणजीत झालेल्या अपघातात एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले.

तर वाळपई येथे कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आले आहे.

रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी गोवा पोलीस आणि वाहतूक पोलीस अपघात प्रवण क्षेत्रात जागोजागी तैनात करण्यात आले असून वाहतुकीचे नियमही कठोर करण्यात आले आलेत. मात्र काही बेशिस्त वाहनचालकांच्या कृतीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT