Goa Drunk and Drive Accident of Tourist vehicle  Dainik Gomantak
गोवा

Goa Drunk and Drive Accident: जीवाचा गोवा करण्याचा नाद भोवला! दिल्ली पर्यटकांच्या 'रेंट अ कॅब'ची दुसऱ्या कारला धडक

पर्यटक जखमी झाले असून त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल

Kavya Powar

Chapora Tourist Accident: राज्यात पर्यटकांचे वाढते अपघात वाहतूक विभागाची डोकेदुखी बनले आहे. पर्यटक मजामस्तीच्या नादात मद्य पिऊन गाड्या चालवतात ज्यामुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना शापोरामध्ये घडली आहे.

डेहराडून आणि दिल्लीतून गोव्यात फिरायला आलेल्या पर्यटकांनी भाड्याची कार बूक केली होती. दरम्यान, त्यांच्या कारचा अपघात झाला आहे.

शापोरा येथे एका घराबाहेर पार्क केलेल्या कारला पर्यटकांच्या रेंट अ कॅबने जोरदार धडक दिली. यामध्ये पर्यटक जखमी झाले असून त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

माहितीनुसार, कारमधील सर्व पर्यटक हे दारूच्या नशेत असल्यामुळे हा अपघात झाला असे बोलले जात आहे. कारण त्यांच्या कारमध्ये दारूच्या अनेक रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत.

पर्यटक जीवाचा गोवा करण्याच्या नादात स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा वाढत्या घटना वाहतूक पोलिसांसमोर आव्हान बनल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT