Goa Drugs
Goa Drugs  Dainik Gomantak
गोवा

Harmal News : हरमलमध्ये रशियन नागरिकाकडून १ कोटी ६९ हजारांचे ड्रग्स जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Harmal News :

पणजी, पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने आज मधलावाडा-हरमल येथे छापा टाकून एका रशियन नागरिकाकडून १ कोटी ६९ हजार ४७ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. अलीकडच्या काळातील पकडलेला हा अमली पदार्थांचा सर्वांत मोठा साठा आहे.

एव्हगेनी मोर्कोविन (वय ३३ वर्षे) हा रशियन नागरिक हरमल येथे भाड्याच्या जागेत राहात होता. तेथेच त्याच्याकडून सायलोसायबिन मशरूम (जादू मशरूम)/(सायकेडेलिक मशरूम) यांची लागवड जप्त केली.

त्याला २१८ ग्रॅम सायलोसायबिन मशरूम, ७.९ किलो मशरूमच्या कळ्या, २ किलो गांजा आणि १५० नग सायलोसायबिन मशरूमच्या बियांसह ताब्यात घेण्यात आले. हा रशियन नागरिक अमली पदार्थ व्यापारात गुंतल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.

‘मॅजिक मशरूम्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सायलोसायबिन मशरूमचा पुरवठा तो करतो, याविषयीची माहिती मिळाल्यावर त्याची पुष्टी करण्यात आली. त्याच्या हालचालींवर पोलिस बारीक लक्ष ठेवून होते.

खात्री झाल्यानंतर मधलावाडा-हरमल येथे त्या रशियन नागरिकाच्या ठिकाणावर छापा टाकण्यात आला आणि त्याला ८.७२ लाख रुपयांचे सायलोसायबिन मशरूम, २ लाख रुपयांचा गांजासह पकडण्यात आले.

छाप्यादरम्यान पोलिसांना आढळून आले की, हा रशियन नागरिक केवळ बंदी घातलेले अमली पदार्थच विकत नाही, तर त्याने १.५८ कोटी रुपये किमतीच्या ७.९३ किलो सायलोसायबिन मशरूमच्या कळ्या प्रतिबंधित पदार्थ वाढवण्यासाठी असंख्य काचेच्या भांड्यांमध्ये पेरल्याचे दिसून आले. त्यासह मशरुमच्या १५० बिया ज्या संशयिताने रुजत घातल्या होत्या, त्याही जप्त केल्या आहेत.

सायकेडेलिक मशरूम पिकवण्यासाठी वापरलेली सिरिंज, काचेची भांडी, खास बनावटीचे प्लास्टिकचे डबे आणि इतर वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर मद्यपींचा धिंगाणा; टॅक्सीचालकाला मारहाण

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

SCROLL FOR NEXT