Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: शिवोलीत 3.5 लाखांचे अमली पदार्थ जप्त; मुंबईचा एकजण अटकेत

Goa Drugs Case: आठवडाभरापूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने 10 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली होती.

Ganeshprasad Gogate

Goa Drugs Case: सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु असून देश विदेशीचे पर्यटक गोव्यात येत आहेत. या दरम्यान गुन्हेगारी आणि अपघातांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणावरून समोर आलंय.

याच संदर्भात एक घटना उत्तर गोव्यातून समोर आलीय. शिवोली येथे क्राईम ब्रांचने 1.5 ग्रॅम गांजा आणि कोकेन पकडले असून या प्रकरणात सहभागी असणाऱ्या प्रणय मोरे नामक मुंबई येथे राहणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजार किंमत 3.5 लाख असल्याची माहितीही समोर येतेय.

मागील आठवडाभरापूर्वी गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 10 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली होती. गिरी, म्हापसा येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकत 19 वर्षीय ओडिशाचा रहिवासी असलेल्या व्यक्तीला अटक केली होती.

शिवोली येथे ताब्यात घेण्यात आलेला संशयित अमली पदार्थ घेऊन गोव्यात कधी आला याबाबत अद्याप महिती समजू शकली नाही.

तसेच त्याने हा अमली पदार्थ कुठून आणला? कुणाला देणार होता? याबाबतही कोणतीही माहिती समजू शकली नाहीय. तांत्रिक देखरेख आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कपणामुळे सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT