Goa Drugs Case: हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या व्यापाराविरुद्ध मोठी मोहीम उघडली असून आज 30 जानेवारी रोजी हणजूण पोलिसांच्या पथकाने हणजूण येथे छापेमारी करत तब्बल 5 लाखांचा गांजा जप्त केलाय.
गोवा पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडली असून किनारी भागात पोलीस विशेष लक्ष ठेऊन आहे.
या घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार हणजुण पोलिसांकडून मंगळवारी केलेल्या कारवाईत पाच लाखांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
यावेळी संशयित सिसीरा गजपती नायक (ओडिसा) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई मंगळवारी दुपारी हणजुण पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
संशयित आरोपी सिसीरा नायक याची सध्या हणजुण पोलिस स्थानकाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
याच घटनेसंबंधी सोमवारी आणखी एक घडामोड घडली असून अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी सिकेरी-कांदोळी भागात मध्यरात्री छापा टाकण्यात आला.
यावेळी ग्राहकाला गांजा पुरवण्यासाठी आलेल्या संशयित इब्राहिम पस्तुनी (45, रामनगर-पर्वरी) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. राज्यभरात अमलीपदार्थ विरोधी प्रकारांबाबत पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.