Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: 'हे' निरीक्षण नोंदवत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सोलोमनचा जामीन म्हापसा न्यायालयाने फेटाळला

Goa Drugs Case: : पोलिसांनी म्हापसा येथील मार्केट यार्डजवळ उगोचुक्वू सोलोमन उबाबूको याला ताब्यात घेतले.

Ganeshprasad Gogate

Goa Drugs Case: गोव्यात अपघातांसोबत गुन्हेगारीचं घटनादेखील वाढत असून अमली पदार्थांची विक्री करण्याचे प्रकार या पर्यटनाच्या राजधानीत राजरोसपणे चालतात. दरम्यान न्यायालयाने अशाच एका घटनेशी संबंधीत असणाऱ्या केससंबंधित एक अपडेट हाती येतेय.

म्हापसा येथे छापा टाकून अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर उगोचुक्वू सोलोमन उबाबूको (39) या नायजेरियन नागरिकाचा जामीन म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

याबाबतचा आदेश न्या. शर्मिला पाटील यांनी दिलाय. सदर अटक करण्यात आलेला उबाबूको हा ड्रग्ज तस्करीतून उदरनिर्वाह करत असल्याचे नाकारता येत नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने या नायजेरियन नागरिकाचा जामीन फेटाळला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा शाखेला म्हापसा येथील मार्केट यार्डजवळ एक विदेशी नागरिक ड्रग्ज तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार, पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन आणि अधीक्षक सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सोमवार दि. 1 जानेवारी रोजी रात्री म्हापसा येथील मार्केट यार्डजवळ सापळा रचला होता.

यावेळी तेथे ड्रग्ज तस्करी करण्यासाठी आलेल्या उगोचुक्वू सोलोमन उबाबूको याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 7.217 ग्रॅम कोकेन, एक मोबाईल आणि 4949 रुपये रोख असे मिळून 1.05 लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त करत अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती.

त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला प्रथम सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली. याच दरम्यान संशयित सोलोमन याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

उगोचुक्वू सोलोमन उबाबूको याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले असून तो ड्रग्ज तस्करीतून उदरनिर्वाह करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील राॅय डिसोझा यांनी न्यायालयात मांडला.

या प्रकरणी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने संशयित सोलोमन याच्या जामीन फेटाळून लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT